April 29, 2025

Home »ई-पेपर धाराशिव जिल्हा पोलीसनामा

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.27 एप्रिल रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 127 कारवाया करुन 93,150 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • तुळजापूर पोलीस ठाणे:आरोपी नामे-पप्पु दामु राठोड, वय 70 वर्षे, रा. कावलदरा ता. जि. धाराशिव हे दि.27.04.2025 रोजी 11.30 वा. सु.तुळजापूर शहरातील लातुर जाणाऱ्या रोडलगत नविन बसस्थानक समोर अंदाजे 2,680 ₹ किंमतीची सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये तुळजापूर पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • आंबी पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-राजु महादेव अडागळे, वय 29 वर्षे, रा. पाथ्रुड ता. भुम जि. धाराशिव यांची अंदाजे 40,000₹ किंमतीची होंन्डा कंपनीची सिडी 110 मोटरसायकल क्र एमएच 25 ए.पी. 2620 ही दि.26.04.2025 रोजी दुपारी 01.00 ते 04.00 वा. सु.सोनारी येथील लहुबाई कल्लोळ मंदीर रोडचे जवळून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-राजु अडागळे यांनी दि.27.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303 (2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-सुधीर उर्फ सुधाकर रामराव घोडके, वय 50 वर्षे, रा. लोहारा ता. लोहारा जि. धाराशिव यांचा अंदाजे 7,000₹ किंमतीचा रेडमी मोबाईल फोन हा दि.27.04.2025 रोजी 09.45 वा. सु.गणपती मंदीर देशपांडे स्टॅण्ड येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुधाकर घोडके यांनी दि.27.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303 (2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • वाशी पोलीस ठाणे : दि. 21.04.2025 रोजी 02.00 ते 03.00 वा. सु. सारोळा वाशी ता. वाशी शिवारातील सेरेंटीक रिन्युएबल्स इंडीया 5 प्रा. लि.कंपनीच्या लोकेशन नं सी आर 32 पवनचक्कीचे आत मधील 162 फुट लांबीची कॉपर केबल अंदाजे 1,51,140₹ किंमतीची अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. तसेच कंट्रोल पॅनलची तोडफोड करुन नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-परमेश्वर मनोहर चेडे, वय 57 वर्षे, रा.वाशी ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.27.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303 (2), 324(1) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “मारहाण.”
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे :आरोपी नामे-आयान मुन्ना कुरेशी,रा. तेरणा कॉलेज धाराशिव, सोहेल इजियास कुरेशी, फैजोद्दीन इब्राहिम कुरेशी दोघे रा.मिली कॉलनी धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.26.04.2025 रोजी 05.00 वा. सु. सरकारी दवाखाना धाराशिव येथे फिर्यादी नामे- शहबाज खादर तांबोळी, वय 25 वर्षे, रा. देशपांडे स्टॅण्ड, झोरे गल्ली, धाराशिव ता. जि. धाराशिव यांना व त्यांचे मित्र खलील शफीक सौदागर व सज्जत रफीक शेख यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लाकडी फळीने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शहबाज तांबोळी यांनी दि.27.04.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथेभा.न्या.सं.कलम 117(2),115(2), 352, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • मुरुम पोलीस ठाणे :आरोपी नामे-कार्तिक बोकले, किरणदास मंडले दोघे रा. बेरडवाडी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.27.04.2025 रोजी 16.00 वा. सु. मुरुम गावालगत असलेल्या इदगा मैदानाजवळ फिर्यादी नामे-विकास दासु राठोड, वय 28 वर्षे, रा. अंबरनगर तांडा मुरुम ता. उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी खांद्यावर हात ठेवण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, हंटर बेल्ट व दगडाने मारहाण करुन जखमी केली.व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-विकास राठोड यांनी दि.27.04.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 115(2), 352, 351(2)(3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • बेंबळी पोलीस ठाणे :आरोपी नामे-शुभम शंकर माने, अविनाश भालचंद्र क्षिरसागर, प्रक्षित धनंजय शिरतोडे, बापु राजेंद्र धुमाळ सर्व रा. नितळी ता. जि. धाराशिव यांनी दि.26.04.2025 रोजी 00.30 वा. सु. हॉटेल रविराज समोर नितळी येथे फिर्यादी नामे-सुजीत विकास बगाडे, वय 23 वर्षे, रा. नितळी ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी तुझे लय दिवस झाले नखरे बघतोय असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, चाकु व काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच भांडण सोडवण्यास आलेले ओमकार महानुभव व प्रविण माळी यांना नमुद आरोपींनी त्यांनाही मारहाण करुन जखमी केले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुजीत बगाडे यांनी दि.27.04.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथेभा.न्या.सं.कलम 118(1), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “रस्ता अपघात.”
  • मुरुम पोलीस ठाणे: मयत नामे-हरुण महंमद बागवान, वय 58 वर्षे, रा. दाळींब ता.उमरगा जि. धाराशिव दि.27.04.2025 रोजी 11.45 वा. सु. लुना मोटरसायकल क्र एमएच 25 ए.जी. 5483 वरुन जात होते. दरम्यान दाळींब येथे एनएच 65 रोडवर उड्डाण पुलाजवळ नळदुर्ग ते उमरगा जाणारे क्रिएटा कार क्र एमएच 14 एल. वा 4211 चा चालक आरोपी नामे-मंगेश सहदेव आरेकर, रा. बरगे वस्ती चिंबळीखेळ ता. पुणे यानी त्याचे ताब्यातील कार ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून हरुण बागवान यांचे लुना मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या अपघातात हरुण बागवान हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-फय्याज रज्जाक बागवान, वय 35 वर्षे, रा.दाळींब ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.27.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125(अ),125(ब), 106 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • येरमाळा पोलीस ठाणे: मयत नामे-मनोज भास्कर देशमुख, वय 47 वर्षे, रा. गौरवाघोली ता. कळंब जि. धाराशिव व सोबत श्रीपती हणुमंत शिंदे हे दोघे दि.10.04.2025 रोजी 14.30 वा. सु. मोटरसायकल क्र एमएच 14 डी.सी. 8747 वरुन गौरकडे जाण्यासाठी येडशी येरमाळा रोडवर मलकापुर पाटी चौकामध्ये रस्ता क्रॉस करण्यासाठी उभे होते. दरम्यान येरमाळा कडून येणारी कार क्र एमएच 21 बी.एफ. 9706 चा चालकाने त्याचे ताब्यातील कार ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून मनोज देशमुख यांचे मोटरसायकलला डाव्या साईडने धडक दिली. या अपघातात मनोज देशमुख हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर श्रीपती शिंदे हे जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-विजयसिंह भास्कर देशमुख, वय 57 वर्षे, रा. गौरवाघोली ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.27.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125(अ),125(बी), 106(1) सह कलम 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!