पारा- ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक एन.बी.सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी तालुक्यातील पारा येथील जय भवानी विद्यालय पारा शाळेला दि.21 एप्रिल 2025 रोजी शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी भेट दिली. या वेळी ते शाळेतील शिक्षकांच्या समस्या , शाळेसाठी आवश्यक सुविधा , यांचा आढावा घेतला.शाळेच्या ग्रंथालय साठी 31000/ रुपयांची पुस्तके देण्यात येतील असे बोलताना आमदार साहेबांनी सांगितले.तसेच पारा येथील अखंड हरिनाम सप्ताह ला देखील हजेरी लावली.गावातील जिल्हा परिषद शाळेला देखील भेट दिली.या वेळी सर्व शिक्षक,व कर्मचाऱ्यांशी हितगुज करुन अडचणीं जाणुन घेतल्या आणि शालेय परिसर व सुविधा पाहुन समाधान व्यक्त केले. या वेळी मुख्याध्यापक एन.बी.सुर्यवंशी,सहशिक्षक एस.डी.भराटे, माळी,मुळे,बांगर,सोलंकर , वाघमारे,मेटे,अमोल गवळी, तुषार डंबरे,आम्ही पारेकर प्रतिष्ठानचे प्रतिष्ठित मान्यवर किशोर पानसे,राजेश भराटे,विष्णु हिंगणे,निंबाळकर,दिलीपराव ढेंगळे,बावी विद्यालयाचे मुख्याध्यापक शिंदे आणि विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
माजी विद्यार्थ्यांनी जपली शाळेची नाळ;जय भवानी विद्यालयात प्रेरणादायी मार्गदर्शन व खाऊ वाटप
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना जय भवानी विद्यालयात अभिवादन
जय भवानी विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा