परंडा – डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समस्त मानव जातीसाठी अनमोल असे कार्य केले.त्यांनी देशाची घटना लिहून देशातील गरीब श्रीमंत दरी नष्ट करून प्रत्येक मानवाला स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार दिला असे प्रतिपादन श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयात आयोजित केलेल्या विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी केले . महाविद्यालयात प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे 134 वी जयंती साजरी करण्यात आली.यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.महेशकुमार माने, प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब दिवाने,कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.पुढे बोलताना डॉ.शहाजी चंदनशिवे म्हणाले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची देशातच नव्हे तर जगामध्ये 150 देशात जयंती साजरी केली जाते.अमेरिकेसारख्या देशांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना द सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून डॉ.बाबासाहेबांचा गौरव केला जातो.डॉ.बाबासाहेब हे भारतीय न्याय शास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ राजकारणी तत्त्वज्ञ आणि समाज सुधारक होते.त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकाविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळ उभारली तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले.देशाच्या विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार अशी त्यांची ओळख आहे.कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले होते . यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ भागातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
तंबाखूचा वापर हे अनेक प्रकारच्या कर्करोगाचे प्रमुख कारण – डॉ.शहाजी चंदनशिवे
भीम प्रतिष्ठानच्या वतीने तथागत गौतम बुद्ध यांची जयंती साजरी
रा.गे.शिंदे महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा