August 8, 2025

छत्रपती शिवाजी महाविद्यालयात क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

  • कळंब – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छ.संभाजी नगर.सलंग्नित छत्रपती शिवाजी महाविद्यालय,कळंब व रासेयो/आयक्युएसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.११/०४/२०२५ शुक्रवार रोजी शैक्षणिक क्रांतीसाठी आपले जीवन अर्पण करणारे सत्यशोधक समाजाचे संस्थापक व थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य ‘महात्मा ज्योतिबा फुले’ यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
    यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य.शशिकांत जाधवर प्रमुख वक्ते प्रा.श्रीमती चोंदे सुनिता तसेच रासेयो/आयक्युएसी विभाग प्रमुख प्रा.अनिल जगताप व प्रा.सौ.मनिषा कळसकर यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले व संस्थापक कै.नरसिंग (आण्णा) जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी प्रमुख वक्ते प्रा.सुनिता चोंदे यानी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जीवन व विविध समाज कार्या विषयी सखोल मार्गदर्शन केले.अध्यक्षीय समारोप प्राचार्य.शशिकांत जाधवर यानी केले.
    यावेळी प्रमुख उपस्थितीत प्रा.राजाभाऊ चोरघडे,प्रा.विजय घोळवे,प्रा.अमोल शिंगटे होते.तसेच महाविद्यालयांतील प्रा.डॉ.पवार,प्रा.शफीक चौधरी, प्रा.पंडित शिंदे,प्रा.अनंत नरवडे,प्रा.डॉ.उद्धव गंभिरे,प्रा.रघुनाथ घाडगे,प्रा.मल्हार शिंदे,प्रा.नामदेव तोडकर,प्रा.सोमनाथ कसबे,प्रा.बाबू पवार,सुंदर कदम,विनोद तुपारे,दत्ता गायकवाड,दतात्रय कांबळे शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.चोरघडे यानी व सुत्रसंचालन प्रा.घोळवे यानी केले.आभार प्रा.बाबू पवार यानी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
error: Content is protected !!