August 8, 2025

महात्मा फुले यांची जयंती विद्यापीठ उपपरिसरात उत्साहात साजरी

  • धाराशिव – डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात महात्मा फुले यांची 197 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचा प्रारंभ महापुरुषांंच्या प्रतिमा पुजनाने करण्यात आला.
    डाॅ. केशव महादेव क्षीरसागर, विभागप्रमुख,हिंदी विभाग, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, धाराशिव यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा.डाॅ.प्रशांत दीक्षित यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषविले.
    विद्यापीठ विकास विभाग समन्वयक,डाॅ.विक्रम शिंदे यांनी प्रास्ताविक केले.
    डाॅ.केेशव क्षीरसागर यांनी आपल्या मार्गदर्शनात महात्मा फुले यांचे विचार आणि कार्य यांचे कालातीत महत्व स्पष्ट केले. महात्मा फुले विशिष्ट युगात महत्व पुर्ण भुमिका निभावणारे महान समाजसुधारक होते.दुसरे महायुद्ध झाल्यानंतर नको युद्ध, हवा बुद्ध हा विचार जगाने स्वीकारला.भारतातील पहिली मुलींची शाळा पुण्यातील भिडेवाडयात सुरु केली.मनुष्य जातीने श्रेष्ठ नसुन,गुण,कर्माने श्रेष्ठ ठरतो.ईश्वर एक असुन, तो निर्विकार आहे. सद्सद्विवेक बुद्धीने चिकित्सक दृष्टीने सत्य गोष्टी स्वीकार केला पाहिजे. मानसिक गुलामगिरी नसावी.
    छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले. शिक्षण हे जीवनोपयोगी असावे. महाविद्यालयीन शिक्षण हे जीवनातील गरजा पूर्ण करणारे असावे. माणसात देव पाहता आला पाहिजे. तृतीय रत्न, गुलामगिरी, शेफकर्यांचा असुड, अखंड इ. साहित्य निर्मिती त्यांनी केली. अलौकिक कार्य त्यांनी केले.
    विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डाॅ. प्रशांत दीक्षित यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी यांनी महापुरुषांचे विचार आत्मसात करावेत व त्यानुसार मार्ग कर्मण करावे. समता सप्ताह निमित्त आयोजित विविध उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. डाॅ. विक्रम शिंदे यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरातील विविध विभागातील प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!