June 20, 2025

जिल्हाधिकारी पुजार यांच्या हस्ते योजनांचा मेळावा व डॉ. आंबेडकर-फुले यांच्या जयंतीनिमित्त आकर्षक देखाव्याचे उद्घाटन

  • धाराशिव (जिमाका) – फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
    दि.११ एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमांतर्गत शासकीय योजनांचा मेळावा व आकर्षक देखाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला नगर परिषदेच्या मुख्याधिकारी वसुधा फड,सिनेट सदस्य देविदास पाठक,वैशाली आकाडे,नायब तहसीलदार स्वामी,महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे व्यवस्थापक बनसोडे,इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे वैभव गोरे,भुजल सर्वेक्षण विभागातील माने यांच्यासह विविध विभागांचे प्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.
    विविध शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉल्सही यावेळी लावण्यात आले.या प्रसंगी फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने आकर्षक देखावा सादर करण्यात आला.यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील झोपडीचे दर्शन,भारताचा कोहिनूर हिरा, महाडचा पाण्याचा सत्याग्रह,तथागत गौतम बुद्धांची भूमीस्पर्श मुद्रा असलेली मूर्ती अशा विविध दृश्यांचा समावेश होता.कार्यक्रमाचे संयोजन समितीचे गणेश वाघमारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.
error: Content is protected !!