August 8, 2025

डॉ.होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत विद्याभवनच्या दर्शन भामरेला सुवर्णपदक

  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली संचलित विद्याभवन हायस्कूल कळंब येथील इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेत असलेला दर्शन जनार्दन भामरे यांने सन २०२४-२५ मध्ये घेण्यात आलेल्या डॉ.होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत बाल वैज्ञानिक म्हणून निवड व सुवर्णपदक प्राप्त केले आहे. बृहन्मुंबई सायन्स टीचर असोसिएशन मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत त्याचा बालवैज्ञानिक म्हणून म्हणून सन्मानपत्र व गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले आहे. स्पर्धेचे बक्षीस वितरण मुंबई येथे करण्यात आले.
    डॉ.अनिल काकोडकर,विनया जगदाळे,दीपक घैसास यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या यशाबद्दल त्याचे ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर,अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर, त्यांच्यासह सर्व संचालक मंडळांनी अभिनंदन केले आहे. त्याचासत्कार विद्याभवन हायस्कूल येथे मुख्याध्यापक कुंभार व्यंकट,उपमुख्याध्यापक विक्रम मयाचारी,पर्यवेक्षिका डॉ.जे.एन.कोळी,यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी मार्गदर्शक शिक्षक पवार दत्तात्रय, बचाटे आर.आर, सागर व्ही.आर, चव्हाण एस.एच यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!