August 8, 2025

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा उत्साहात संपन्न

  • वाशी — वाशी तालुक्यातील पारा येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिम्मित महापुरुषांच्या जीवनकार्यावर आधारित सामान्य ज्ञान स्पर्धा भिमजन्मोत्सव समिती आणि नालंदा वाचनालय भिमनगर, पारा यांच्या वतीने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पारा आणि ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संचलित जय भवानी विद्यालय पारा येथे दि.८ एप्रिल रोजी संपन्न झाली.
    प्रश्नमंजुषा स्पर्धेत इयत्ता १ ली ते ७ वी दोन्ही शाळामधुन १४४ विद्यार्थी तर जय भवानी विद्यालय येथुन इयत्ता ८ वी ते १० वी च्या ६५ विद्यार्थ्यांनी, अशा एकूण २०९ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
    ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संतोष शिंदे,यशवंत गवळी, अश्वजीत शिनगारे,किशोर शिनगारे,सिध्दार्थ शिनगारे आणि तुषार गवळी यांनी विशेष प्रयत्न घेतले.
    राजेश भराटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली.दोन्ही शाळेतील शिक्षकांचे यावेळी विशेष सहकार्य लाभले.
error: Content is protected !!