धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.07 एप्रिल रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 271 कारवाया करुन 2,21,750₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
मा.पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक श्री. शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली काल सोमवार दि.07.04.2025 रोजी अवैध मद्य विरोधी धाराशिव जिल्हयात पोलीस ठाणे हद्दीत 10 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेले सुमारे 200 लिटर गावठी दरु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव, 190 लिटर गावठी दारु व देशी विदेशी दारुच्या 54 सिलबंद बाटल्याअसे मद्य जप्त करण्यात आले. सदर जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 31,405 ₹ आहे. यावरुन महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 17 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.
1)आनंदनगर पो ठाणेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-शशिकांत मोहन वाघमारे, वय 59 वर्षे, रा.भिमनगर शिंगोली ता.जि.धाराशिव हे 14.00 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 1,000किंमतीची 10 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-शेवंता दत्ता पवार, वय 42 वर्षे, रा. सांजा पारधी पिडी ता. जि. धाराशिव या 16.30 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 3,000 किंमतीची 30 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
2)नळदुर्ग पो ठाणेच्या पथकाने 3 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-अशोक रामराव बनसोडे, वय 60 वर्षे, रा. चिवरी ता. जि. धाराशिव हे 16.30 वा. सु. आपल्या राहत्या घराचे पाठीमागे अंदाजे 1,200 किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 16 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे- दादाराव गणपती शिंदे, वय 45 वर्षे, रा. इंदीरानगर चिवरी ता. जि. धाराशिव हे 17.20 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 3,600 किंमतीची 40 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-लक्ष्मण नामदेव कोरे, वय 41 वर्षे, रा.लक्ष्मीनगर चिवरी ता.तुळजापूर जि. धाराशिव हे 20.30 वा. सु. आपल्या राहते घरासमोर चिवरी येथे अंदाजे 4,500 किंमतीची 50 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
3)वाशी पो ठाणेच्या पथकाने ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-ताई राजेंद्र काळे, वय 48 वर्षे, रा. पारधी पीडी पार्डी ता.वाशी जि. धाराशिव या 07.35 वा. सु. आपल्या राहते घराचे बाजूला अंदाजे 12,350 किंमतीचे 200 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले.
4)शिराढोण पो ठाणेच्या पथकाने ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-अशोक माणिक कांबळे, वय 29 वर्षे, रा. शिराढोण ता. कळंब जि. धाराशिव हे 13.30 वा. सु. शिराढोण झोपडपट्टी येथे पत्र्याचे शेडचे बाजूस अंदाजे 600 किंमतीची 10 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
5)ढोकी पो ठाणेच्या पथकाने ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-मोहन अंकुश पाटील, वय 38 वर्षे, रा. कोंड ता. जि. धाराशिव हे 13.15 वा. सु. कोंड बसस्थानक ते भिमाशंकर मंदीर रोडलगत अंदाजे 2,525 किंमतीची 25 लिटर गावठी दारु व देशी विदेशी दारुच्या 15 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.
6)धाराशिव ग्रामीण पो ठाणेच्या पथकाने ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-राणुबाई शिवाजी जाधव, वय 69 वर्षे, रा. अंबेजवळगे तांडा ता. जि. धाराशिव हे 12.30 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 1,280 किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 8 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.
7)परंडा पो ठाणेच्या पथकाने ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-दत्तात्रय हरीदास कानगुडे, वय 44 वर्षे, रा. इडा ता. भुम जि. धाराशिव हे 20.15 वा. सु. हॉटेल जय मल्हारचे बाजूला अंदाजे 1,350 किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 15 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.
“ जुगार विरोधी कारवाई.”
परंडा पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान परंडा पोलीसांनी दि.07.04.2025 रोजी 17.30 वा. सु. परंडा पो ठाणे हद्दीत सार्वजनिक ठिकाणी द्रावण भिमनगर समाज मंदीराचे शेजारी परंडा येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-जयवर्धन गोवर्धन शिंदे, वय 40 वर्षे, रा. द्रावण भिमनगर परंडा ता. परंडा जि. धाराशिव हे 17.30 वा.सु. द्रावण भिमनगर समाज मंदीराचे शेजारी परंडा येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,700 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले परंडा पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये परंडा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे नोंद.”
आनंदनगर पोलीस ठाणे:आरोपी नामे-जावेद रफिक शेख, वय 39 वर्षे, रा.खाजा नगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.07.04.2025 रोजी 12.30 वा. सु. आपल्या ताब्यातील रिक्षा क्र एमएच 25 एके 4875 हा बसस्थानक समोरील डांबरी सार्वजनिक रोडवर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना आनंदनगर पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285अन्वये आनंदनगर पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग पोलीस ठाणे:आरोपी नामे-सय्यद मुस्ताक जहागीरदार, वय 48 वर्षे, रा. नळदुर्ग ता.तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.07.04.2025 रोजी 16.45 वा. सु. आपल्या ताब्यातील टाटा मॅजिक क्र एमएच 24 व्ही 8813 हा नळदुर्ग बसस्थानक परिसर येथे सार्वजनिक रोडवर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना नळदुर्ग पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285अन्वये नळदुर्ग पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
कळंब पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-समाधान गंगाधर आडसुळ, वय 35 वर्षे, रा. ईटकुर ता. कळंब जि. धाराशिव यांची अंदाजे 20,000₹ किंमतीची हिरो स्प्लेंडर मोटरसायकल क्र एमएच 25 एएफ 9726 ही दि.07.04.2025 रोजी 08.15 ते 09.15 वा. सु. जि.प.प्राथमिक शाळा कळंब समोरील देवी रोडकडे जाणारे रोडलगत कळंब येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-समाधान आडसुळ यांनी दि.07.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-दिपक किसन परदेशी, वय 68 वर्षे, रा. कोंड ता. जि. धाराशिव यांचे कोंड शिवारातील शेत गट नं 121 मधील 3 हरभरा पिकाचे कट्टे अंदाजे 4,800₹ किंमतीचा माल दि.06.04.2025 रोजी 07.15 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-दिपक परदेशी यांनी दि.07.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“मारहाण.”
नळदुर्ग पोलीस ठाणे :आरोपी नामे-हरिशचंद्र यादर कुंभार, किरण हरिश्चंद्र कुंभार, मंगलबाई हरिश्चंद्र कुंभार, मनिषा राम कुंभार, पुनम किरण कुंभार, राम हरिश्चंद्र कुंभार, रा. शहापुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.06.04.2025 रोजी 09.00 वा. सु. शहापुर शिवारातील शेतात फिर्यादी नामे-डिगंबर दत्तु काळे, वय 60 वर्षे, रा. शहापुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेतातील बांधाचे कारणावरुण गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, इगड व काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीचे पत्नी संगीता, मुलगा नेताजी व भाउ संभाजी हे भांडण सोडवण्यास आले असता त्यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी माराहण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-डिगंबर काळे यांनी दि.07.04.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1),115(2), 352, 351(2), 189(2), 191(2), 191(3), 190 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग पोलीस ठाणे :आरोपी नामे-नेताजी दिगंबर काळे, दिगंबर दत्तात्रय काळे, बबन दत्तात्रय काळे, संगीता दिगंबर काळे सर्व रा. शहापुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.06.04.2025 रोजी 09.00 वा. सु. शहापुर शिवारातील शेतात फिर्यादी नामे-मनिषा राम कुंभार, वय 27 वर्षे, रा. शहापुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेतातील सामाई बांध कोरण्याचे व बांधावर दगड टाकण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठी व कुह्राडीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादीचे दिर किरण हरिश्चंद्र कुंभार व सासरे हरिश्चंद्र कुंभार, यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी माराहण करुन जखमी केले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मनिषा कुंभार यांनी दि.07.04.2025रोजी दिलेल्या वैद्यकिय जबाबावरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम118(2), 118(1), 115(2), 352, 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर पोलीस ठाणे :आरोपी नामे-सुरज सायस कांबळे, रा. ढेकरी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.20.03.2025 रोजी 22,40 वा. सु. ढेकरी येथे फिर्यादी नामे-सायस धोंडीबा शेंडगे, वय 57 वर्षे, रा. ढेकरी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने अंगावर का थुंकतो असे विचारण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, हातातील कड्याने मारहाण करुन नाकाचे हाड फॅक्चर करुन गंभीर जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सायस शेंडगे यांनी दि.07.04.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 117(2), 115(2),352, 351(2),351(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“रस्ता अपघात.”
भुम पोलीस ठाणे: मयत नामे-आप्पा कांबळे, रा. बावी ता. भुम जि. धाराशिव हे दि. 12.03.2025 रोंजी 19.30 वा. सु. पाथरुड ते बावी रोडवर रेणुकादेवी पाटी जवळुन मोटरसायकल क्र एमएच 12 सीयु 3874 वरुन जात होते. दरम्यान बलेनो कार क्र एमएच 25आर 8421 चा चालकाने त्याचे ताब्यातील कार ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून आप्पा कांबळे यांचे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या अपघातात आप्पा कांबळे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-जयश्री आप्पा कांबळे, वय 27 वर्षे, रा.बावी ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.07.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106(1) सह 134(अ)(ब),184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
“पवनचक्कीतील तांब्याच्या तारा लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.”
आरोपींकडून धाराशिव जिल्हयातील ०७ गुन्हे उघड…..
दि.१९.०३.२०२५ रोजी पोलीस ठाणे नळदुर्ग हददीतील मौजे गंधोरा पाटी येथे काही अज्ञात चोरटयांनी रिन्यू कंपनीच्या पवनचक्कीचे रखवालदारांना बांधून ठेवून त्यांना मारहाण करून तेथील पवनचक्कीचे आतील वायरमधील तांब्याच्या तारा बळजबरीने चोरून नेली होती. सदरबाबत पोस्टे नळदुर्ग येथे अज्ञात आरोपीविरोधात गुरनं क्र गुरनं ८८ / २५ क कलम ३०९ (६), ३२४(५), ३(५) भान्यासं अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरील गुन्हा हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने वरीष्ठ अधिका-यांनी सखोल चौकशी करून गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्या. सदरील गुन्हयाचे घटनास्थळ तसेच आजूबाजूचे परीसराची पाहणी करून स्थानिक गुन्हे शाखेतील सहा पोलीस निरीक्षक कासार व त्यांचे पथकाने तंत्रज्ञानाचे सहाय्याने तसेच पारंपारीक स्त्रोताकडून गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने काही महत्वपुर्ण पुरावे शोधून काढले. उपलब्ध माहितीला अनुसरून १ ) सुनिल कालीदास शिंदे वय ३६ वर्ष रा.दत्तनगर पारधी पिढी ढोकी ता. जि. धाराशिव, २) सरदार उर्फ गणेश शंकर काळे रा. कन्हेरवाडी ता. कळंब जि. धाराशिव ह. मु. येळंब घाट ता. जि. बिड, ३) राहुल लाला शिंदे वय २९ वर्ष रा. दत्तनगर पारधी पिढी ढोकी ता.जि.धाराशिव यांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीदरम्यान तीनही आरोपींना नमुद गुन्हा त्यांनी स्वत: आणि इतर ०८ आरोपीनी मिळून केल्याची कबुली दिली. तसेच धाराशिव जिल्हयात यापुर्वी दाखल अशाच स्वरूपाच्या इतर ०६ गुन्हयाची देखील आरोपींनी कबुली देवून त्यांतील एकूण ७२१ फुट लांबीची तांब्याची तार व गुन्हयात वापरलेले वाहन टाटा सुमो असा एकूण १२.२३,४५० रु चा मुददेमाल काढून दिलेला आहे. ताब्यात घेतलेले आरोपी व मुददेमाल पुढील कारवाईकामी पोलीस ठाणे नळदुर्ग यांचे ताब्यात देण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव यांनी मागील काही दिवसांपासून पवनचक्कीवर लुटमार करणरी टोळी ताब्यात घेतल्यामुळे पवनचक्की कंपन्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विनोद इज्जपवार यांचे नेतृत्वात सपोनि श्री. सुदर्शन कासार यांनी स्वतः व त्यांचे पथकातील सपोफौ वलीउल्ला काझी, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फहरान पठाण, दयानंद गादेकर, पोअं योगेश कोळी, चालक नितीन भोसले यांनी यशस्वीरित्या पुर्ण केली आहे. (सोबत छायाचित्र जोडले आहे.)
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला