August 9, 2025

डिकसळची स्वप्ननगरी वसाहतीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

कळंब – उपविभागीय अधिकारी कळंब यांना निवेदन देऊन सुध्दा त्यांनी कसलीच कार्यवाही न करता किंवा संबंधितावर गुन्हा दाखल न करता मुद्दाम जाणुन बुजुन प्रकरण दडपवुन ठेवल्याबद्दल समस्त गावकरी मौजे डिकसळ ता.कळंब येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी किरण कीर्ती पुजार यांना भेटून उपविभागीय अधिकारी कळंब, तहसीलदार कळंब व मंडळ अधिकारी यांच्यावर तातडीने कारवाई करा अशी मागणी केली.
त्याबद्दल सविस्तर वृत्त असे की, मौजे डिकसळ ता.कळंब जि. धाराशिव येथे बेकायदेशीररीत्या स्वप्ननगरी वसाहतीचे बांधकाम झाले असून सदरील वसाहतीच्या मालकांनी मौजे कळंब ढोकी रस्ता राज्यमार्ग २०८ वरील साखळी क्र. १/६०० मध्ये रस्त्याच्या डाव्या बाजुस असणाऱ्या पुलालगत असणाऱ्या नैसर्गीक खटकळी ओढ्याचा प्रवाह बेकायदेशीररित्या अडवुन रस्ता तयार केला आहे.ज्यामुळे पुलास धोका निर्माण झाला असल्यामुळे याबाबत मोक्याच्या ठिकाणी येवून,स्थळ पहाणी करुन,वस्तुस्थिती व सत्य परिस्थीती जाणुन घेवुन,नैसर्गीक ओढ्यावर अतिक्रमण करुन ओढ्यामुळे नैसर्गीक प्रवाह वळवून त्या जागेवर स्वप्ननगरी वसाहत निर्माण करणाऱ्या मालकावर तात्काळ कायदेशीर कार्यवाही करुन त्यांचेवर गुन्हे दाखल करवी अशा मागणीचे निवेदन डिकसळ ग्रामस्थांनी दिनांक ०३/०२/२०२५ रोजी मा. उपविभागीय अधिकारी साहेब कळंब यांना सक्षम भेटून निवेदन सादर केले होते. निवेदन सादर करुन जवळपास दोन महिने झाले तरी उपविभागीय अधिकारी कळंब यांनी कसलीच कार्यवाही केलेले नाही.प्रकरणाचे महत्व व गांभीर्य ओळखुन उपविभागीय अधिकारी कळंब यांनी तात्काळ कार्यवाही करणे अपेक्षीत होते.परंतु उपविभागीय अधिकारी कळंब यांनी याकामी कमालीची उदासिनता दाखविली असल्याचे दिसून येते.आम्ही गावकरी मंडळी सतत उपविभागीय अधिकारी कळंब, तहसीलदार कळंब,मंडळ अधिकारी,तलाठी सज्जा डिकसळ ता.कळंब यांना समक्ष भेटून याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यास विनंती करुन सुध्दा कोणीच या कामाची दखल घेण्यास तयार नाहीत.उलट जाणीवपुर्वक या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे प्रकर्शाने जाणवत आहे.सदरील ओढ्याचा नैसर्गीक पाण्याचा प्रवाह बदल्यामुळे पावसाळ्यामध्ये मौजे तांदुळवाडी,पिंपळगांव (डोळा), डिकसळ या गावाच्या परिसरातील पाणी सदर ओढ्यामध्ये वाहत येवून मांजरा नदीच्या पात्रात जातो व मांजरा नदीच्या पात्रातुन मौजे धनेगांव येथील मांजरा डॅम ला जावुन मिळतो.परंतु सदरील ओढ्याचा नैसर्गीक प्रवाह स्वप्ननगरी वसाहतीच्या मालकांनी बेकायदेशीररीत्या आडवुन त्यावर अनाधिकृतरित्या बांधकाम केल्यामुळे पावसाळ्यामध्ये वाहत आलेले पाणी सदरील नाल्याच्या पुलाजवळ तुंबून राहील.त्यामुळे पुलास धोका तर निर्माण होईलच.पण आजुबाजुच्या परिसरात पाणी पसरून सदरील नाल्यालगत असलेले कृष्णा हॉस्पीटल व इतर लोकांची घरे, दुकानामध्ये पाणी शिरुन जिवीत हानी होण्याची दाट शक्यता आहे.प्रसंगी सदरचा पुल पाणी तुंबल्यामुळे तुटण्याची भीती आहे.त्यामुळे वाहतुक बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.याची तक्रार उपविभागीय अधिकारी कळंब यांना करून देखील त्यांनी जाणीवपूर्वक कारवाईस खूप दिरंगाई लावली आहे. तरी जिल्हाधिकारी यांना डिकसळ ग्रामस्थांनी निवेदन देऊन या कामी आपण स्वतः जातीने लक्ष देऊन संबंधीत दोषी लोकाविरुध्द योग्य कार्यवाही करुन, गुन्हे दाखल करावेत. व या प्रकरणात जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर देखील कारवाई करावी असे म्हटले आहे.
या निवेदनावर डिकसळ ग्रामपंचायत सदस्य इम्रान मुल्ला, मोबीन मणियार,आनंत बोराडे, रफिक सय्यद यांच्यासह भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष विकास कदम,युवराज पिंगळे,अखिल काजी, दीपक गवळी, जिव्हेश्वर कुचेकर,गणेश त्रिवेदी,अभय गायकवाड,अलीम दारूवाले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

error: Content is protected !!