August 9, 2025

अभिजित मोहेकर यांना पीएच.डी.पदवी प्रदान

  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळाचे अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर यांचे सुपुत्र अभिजित मोहेकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने शारीरिक शिक्षण या विषयामध्ये पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर व संचालिका प्रा.अंजली मोहेकर यांच्या हस्ते डॉ.अभिजीत मोहेकर यांचा पुष्पगुच्छ व शाल देवून सन्मान करण्यात आला.
    याप्रसंगी सा.साक्षी पावनज्योत उपसंपादक अरविंद शिंदे, उपसंपादक डॉ.कमलाकर जाधव,प्रा.लोमटे,संतोष मोरे आदींची उपस्थिती होती.
    त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
error: Content is protected !!