August 9, 2025

पंडित कांबळे यांच्या पुस्तकास बाबुराव बागुल राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

  • धाराशिव – जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या वतीने हिंदी साहित्य भवन मधुरम सभागृह झाशी राणी चौक,सीताबर्डी, नागपूर येथे रविवार दिनांक 30 मार्च 2025 रोजी जागतिक साहित्य महामंडळाच्या अकराव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय,राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक कुमार खोब्रागडे हे होते.पंडित कांबळे यांच्या “खुटकंदील योगीराज वाघमारे यांच्या अभ्यासक्रमीय कथा” या संपादित कथासंग्रास बाबुराव बागुल राज्यस्तरीय पुरस्कार डॉ.राजेश गायकवाड, सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई, डॉ. प्रकाश करमाडकर, कुलगुरू आर्यवृत्त आंतरराष्ट्रीय विद्यापीठ,त्रिपुरा यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन प्रदान करण्यात आला.यावेळी डॉ.जगन कराडे, समाजशास्त्र, विभाग शिवाजी, विद्यापीठ, कोल्हापूर,डॉ.अनिल रामटेके प्रसिद्ध नाटककार व साहित्यिक मुंबई , डॉ.विद्याधर बन्सोड, प्रसिद्ध साहित्यिक चंद्रपूर,सुजित मुरमाडे, नागपूर,डॉ .विलास तायडे, साहित्यिक अकोला, डॉ. भूपेश पाटील,डॉ.रवींद्र तिरपुडे, डॉ. अनिल काळबांडे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
    पंडित कांबळे हे नगरपरिषद शाळा क्रमांक 14 धाराशिव येथे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम करतात. त्यांचे आतापर्यंत तीन कवितासंग्रह, तीन बालकविता संग्रह, पाच संशोधनात्मक संपादित पुस्तके, एक समीक्षा ग्रंथ अशी बारा पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांना मान्यवर संस्थांचे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या अनेक कविता हिंदी भाषेत अनुवादित होऊन विविध राज्यातील अंकातून व संपादनातून प्रकाशित झालेल्या आहेत.
    पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अनेक साहित्यिक मित्र, नातेवाईक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
error: Content is protected !!