August 8, 2025

कळंब येथे मराठा युवकांचे आरक्षणासाठी साखळी उपोषण

  • कळंब- शिक्षण व नोकरीत आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात सुरू करण्यात आलेले साखळी उपोषण सलग तेराव्या दिवशी सोमवारी (दि.२५ ) सुरूच होते.दरम्यान, आंदोलनस्थळी छत्रपती शिवाजी महाराजांची शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते दोन वेळेत आरती करण्यात येत आहे.
    जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दि.१३ सप्टेंबर २०२३ पासून कळंब येथे सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण आंदोलन सुरु करण्यात आले होते.
    या आंदोलनाला खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील,
    खासदार रजनीताई पाटील यांचे तर्फे त्यांचे दिर,काँग्रेस आय, स्वर्गीय गणपतराव कथले आघाडी,मुस्लिम ब्रिगेड, राष्ट्रवादी काँग्रेस,बागवान मुस्लिम,संभाजी ब्रिगेड,टायगर ग्रुपच्या वतीने भेट देत पाठिंबा दिला आहे.
    या आंदोलनात ज्योतीताई सपाटे,अँड.मनोज चोंदे, अतुल गायकवाड,अँड.तानाजी चौधरी,अनिल फाटक,प्रा.संजय घुले,सतिश टोणगे,निर्भय घुले,प्रतिक गायकवाड, सनी बोरगे आदींचा समावेश आहे.

 

error: Content is protected !!