पिंपळगाव (डोळा) (राजेंद्र बारगुले)- गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर,दि.२९ मार्च २०२५ रोजी त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर घरकुल आवास योजनेअंतर्गत लाभार्थींच्या घरकुल व गाव विस्तारवाढीत ३० वर्षाच्या संघर्षातून मिळालेल्या जागेच्या बांधकामाचे भूमिपूजन पिंपळगाव डोळा ता.कळंब येथे मोठ्या उत्साहात पार पडले.
एक हेक्टर जमिनीवरती ६० लाभार्थी असून रोडच्या कडेला ग्रामपंचायत कार्यालय, कार्यक्रमासाठी मोकळी जागा व व्यापारी संकुलन उभे राहणार आहे.
या आवास योजनेचे भूमिपूजन गावाचे विकासाभिमुख कुशल नेतृत्व असणारे मार्गदर्शक काँग्रेस आय चे जिल्हा उपाध्यक्ष भागवतराव धस यांच्या शुभहस्ते करण्यात आले.रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत अविनाश घोडके,सागर घोडके आणि कल्पना अंकुश घोडके यांच्या घरकुलाचे पायाभरणी शुभारंभ संपन्न झाला.
यावेळी गावातील मान्यवर, ग्रामस्थ आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख उपस्थितांमध्ये संपादक सुभाष घोडके,माजी ग्रामपंचायत सदस्य देविदास घोडके,रोजगार सेवक सौदागर जगताप, ग्रामपंचायत सदस्य श्रीरंग घोडके,छबुराव दत्त,विकास घोडके,संदीप दहीरे,मंगेश दहिरे,मोहन कांबळे,सुरेश मांदळे,नितीन दहिरे,अमोल घोडके,दस्तगीर शेख,विजय कांबळे,किसन कांबळे यांचा समावेश होता.रमाई घरकुल आवास योजना,यशवंतराव चव्हाण भटके विमुक्त आवास योजना, पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू कुटुंबांसाठी घरकुल स्वप्न साकार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे.या कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामविकासाला चालना मिळणार असून,समाजातील प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळावे, हा शासनाचा आणि स्थानिक नेतृत्वाचा उद्देश आहे.
More Stories
गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केल्यानं इतर विद्यार्थी प्रेरित होतात – भागवतराव धस
गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केल्यानं इतर विद्यार्थी प्रेरित होतात – भागवतराव धस
अंबाबाई यात्रा महोत्सव उत्साहात संपन्न