ऐरंडगाव – गट ग्रामपंचायत ऐरंडगाव येथील लेखक, दिग्दर्शक,नाटककार,गीतकार, अभिनेता,गावचे सरपंच राहुल वानखडे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत जिल्हा परिषद अमरावती सन ( 2024- 2025 ) मध्ये राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत भारतीय व्यवस्थापन संस्था नागपूर इंडिया इंडस्टुट ऑफ मॅनेजमेंट (आय आय एम) नागपूर येथे आयोजित करावयाच्या मॅनेजमेंट इंटरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम या 5 दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रम करिता निवड करण्यात आली आहे.ग्रामीण भागात वास्तव्यास असलेले शेती मातीतले कलावंत,लेखक, दिग्दर्शक,अभिनेता,ऐरंडगावचे एक जबाबदार नागरिक म्हणजेच गावचे नेतृत्व करणारे सरपंच राहुल वानखडे अशा गावी राहतात.जिथे पोस्ट देखील नाही एस टी बस सुद्धा गावात येत नाही.अशा ग्रामीण भागातून आय आय एम प्रशिक्षणासाठी नागपूरला निवड करण्यात आली.जेथे महाराष्ट्रातील अनेक अभ्यासू,सी ओ, कलेक्टर,प्रधान,सचिव, मार्गदर्शक,तज्ञ,उपस्थित आहेत. नागपूर मध्ये प्रशिक्षणासाठी अमरावती जिल्हा परिषद जिल्ह्यातून एरंडगाव गट ग्रामपंचायतचे सरपंच राहुल वानखडे यांची निवड झाल्याबद्दल गावासाठी तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी हे खूप अभिमानाची बाब आहे. राहुल वानखडे यांचे अभिनंदन कौतुक पंचायत समिती दर्यापूरचे गटविकास अधिकारी,विस्तार अधिकारी तसेच हिम्मत फिल्म प्रोडक्शनचे रविराज देशमुख , सुबोध देशमुख,खासदार बळवंत वानखडे,अभिनंदन करीत आहेत,एरंडगावचे ग्रामसेवक तळोकार,ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच,अंतरगाव शिवाजीचे संजय भाऊ नागरे,एरंडगाव, राजखेड येथील सर्व नागरिक हास्य कवी प्रशांत दामले, शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत
More Stories
“धाडस,विचार आणि सेवा यांचा संगम – पँथर अशोक कसबे” (वाढदिवस विशेष लेख)
अधिकारी व्हायचे असेल तर जि.प शाळेतच प्रवेश घ्या – उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे
छत्रपती संभाजी विद्यालयात प्रवेश उत्सव उत्साहात साजरा