कळंब – तालुक्यातील विविध शाळांमधील सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात नवोदय विद्यालय तुळजापूर येथे प्रवेश पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार महात्मा फुले अर्बन को ऑप.क्रेडिट सोसायटी च्या कार्यालयात राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघाचे वतीने करण्यात आला. राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघाचे राज्य सरचिटणीस तथा राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष भोजने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात मौजे हासेगाव (के) येथील समर्थ अशोक तोडकर,अक्षरा वैभव तोडकर, वैष्णवी प्रदीप यादव,श्रेया पांडुरंग धुमाळ,कन्हेरवाडी येथील यशराज परमेश्वर वाघमोडे,इटकूर येथे कार्यरत शिक्षक गिरी सर यांचा मुलगा अक्षय बजरंग गिरी यांचा शाल,पुष्पहार व पेढा भरवुन सत्कार करण्यात आला. यावेळी खोंदला शाळेतील उपक्रमशील शिक्षक आणि कळंब तालुका शिक्षक सहकारी पतसंस्था संचालक सुनिल बोरकर यांचाही वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.महात्मा फुले अर्बन को ऑप.क्रेडिट सोसायटी चे सचिव अरुण माळी,राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे तालुकाध्यक्ष भास्कर कांबळे,नानासाहेब कवडे,सचिन काळे,शंतनु माळी,लालासाहेब धोंगडे,अनिल शेळके,राज बिक्कड स्वप्नपुर्ती कन्स्ट्रक्शन चे संचालक आणि शिवव्याख्याते महादेव खराटे,धिरज दुधाळ, गोकुळ बरकसे,अशोक तोडकर, वैभव तोडकर,पत्रकार प्रदीप यादव,परमेश्वर वाघमोडे,बजरंग गिरी यांच्या सह पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सावित्रीबाई फुले विद्यालयाचे सहशिक्षक तथा सावतामाळी नर्सरी चे संचालक ज्ञानेश्वर तोडकर यांनी तर आभारप्रदर्शन अरुण माळी यांनी केले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले