कळंब ( माधवसिंग राजपूत ) – चैत्र गुढी पाडवा सणासाठी साखरेची घाठी हार याला विशेष महत्त्व आहे.मराठी वर्षाची सुरुवात चैत्र महिन्या पासून होते व चैत्र प्रतिपदा नववर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा सण आपल्याकडे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.या नववर्षाचे स्वागत घराच्या अंगणात व घरावर गुढी लावून मोठ्या थाटात केले जातो या सणात गुढीसाठी साखरेचे घाठी हार याला विशेष महत्त्व आहे तसेच लहान मुलांच्या गळ्यात साखर हार घालून स्वागत केले जाते यासाठी स्नेही,मित्र परिवाराकडे हे साखरहार पाठविले जातात.या साखरेच्या घाठी बनवण्याचा व्यवसायही काही कुटुंबे परंपरेने करीत आहे.यापैकी कळंब शहरातील बालाजी गंगाधर आळणे यांचे कुटुंब कै.लिंबाजी आळणे ,गंगाधर आळणे,व आता बालाजी गंगाधर आळणे अशा तीन पिढीपासून साखरेच्या घाठी बनविण्याचा व्यवसाय करत आहेत.याची तयारी एक महिन्यापासून सुरू असते. यासाठी त्यांचे कुटुंबीय व कामगार मिळून एकूण १२ माणसे काम करतात.यासाठी घरची जागा अपुरी पडत असल्याने त्यांनी घरासमोर तात्पुरता पेंडॉल उभा केला असून यात हे काम सुरू आहे. घाठी तयार करण्यासाठी साखरेचा पाक करून हा पाक लाकडाच्या नक्षीकाम केलेल्या साच्यात ओततला जातो.यामध्ये लहान मोठे ५०,१००,२००,३०० ग्राम आकाराचे घाठी हार मागणीनुसार तयार केले जातात. कळंबच्या साखर घाठी हाराला बाहेरच्या विशेष शहरी बाजारपेठेत मोठी मागणी आहे. यामुळे गुणवत्ता व दर्जा यामध्ये कमी पडू नये व स्पर्धेमध्ये आपला माल अधिक उठावदार कसा असेल यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे. हा तयार झालेला माल पुणे,पंढरपूर ,बार्शी, तुळजापूर, धाराशिव व स्थानिक कळंब बाजारपेठेत पाठविला जातो याचा भाव साखरेच्या भावावर अवलंबून असतो साखरेचा भाव ४२ रुपये प्रति किलो आहे तर प्रति व्यक्ती ४०० रुपये प्रमाणे मजुरीचा खर्च आहे. यावर्षी बाजारपेठे साखर घाठीला चांगली मागणी आहे असून ठोक ६००० क्विंटल भाव मिळत आहे असे बालाजी आळणी यांनी सांगितले कारखान्यात राजश्री आळणे,अंजली आळणे,हर्षद आळणे,सोमेश आळणे,बाळू कदम,यांची विशेष मदत होते असे सांगितले.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर