कळंब – प्रतिवर्षाप्रमाणे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग,गुणवत्ता हमी कक्ष आणि राष्ट्रीय सेवा विभागाच्या संयुक्त विद्यमाने आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची ११२ वी जयंती साजरी करण्यात आली.यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.हेमंत भगवान यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितीत सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी,डॉ.रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.आर. व्हि.ताटीपामूल,डॉ.संदिप महाजन,डॉ.गणेश पाटील,प्रा. करंजकर ,गणेश आडे,नेताजी देशमुख,तसेच बहुसंख्य विद्यार्थिनी विद्यार्थी उपस्थित होते.सदर कार्यक्रम ज्ञान प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे अधीक्षक हनुमंत जाधव,संतोष मोरे,रमेश पवार, माणिक खंडागळे,कमलाकर बंडगर,बालाजी डीकले,भारत शेळके,अर्जुन वाघमारे,रमेश भालेकर यांनी सहकार्य केले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले