कळंब – शहरातील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विस्ताराधिकारी बीड ऋषिकेश शेळके तर उद्घाटक म्हणून पोलीस निरीक्षक रवी सानप, प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी सुशील फुलारी उपस्थित होते.वार्षिक स्नेहसंमेलनात चिमुकल्या बालगोपाळांनी देशभक्तीपर, शेतकरी,लोकगीत,शिक्षण विषयक अशा विविध कला प्रकारावर नृत्य सादर केली. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्रा. नवनाथ करंजकर,सूत्रसंचलन प्राचार्य टी.एस.सय्यद यांनी केले. आभार संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर तोडकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी कोषाध्यक्ष गणेश करंजकर,शिक्षक,कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले