June 21, 2025

सावित्रीबाई फुले विद्यालयात विज्ञान प्रदर्शन संपन्न

  • कळंब – शहरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक विज्ञान दिनाच्या औचित्य साधून विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य काकासाहेब मुंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून हेमंत ढोकले तहसीलदार कळंब,नायब तहसीलदार विष्णुदास भराडीया, संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.पांडुरंग भवर,शिक्षण विस्ताराधिकारी संतोष माळी,सुलभा शिंदे हे उपस्थित होते.सदरील विज्ञान प्रदर्शन इयत्ता 5 वी ते 9 वी पर्यंत भरवण्यात आले होते. विज्ञान प्रदर्शनात,पवनचक्की,सोलर सिस्टिम,विटामिन पिरॅमिड,ध्वनी प्रदूषण,जलप्रदूषण,वायुप्रदूषण , अशा विविध घटकावर विद्यार्थ्यांनी प्रयोग सादरीकरण केले होते.तहसीलदार साहेबांनी सदरील प्रयोग पाहून समाधान व्यक्त केले व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक मुख्याध्यापक यांचे कौतुक केले.सदरील प्रदर्शन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विज्ञान विषयक शंकर गोंदकर, सोमनाथ सावंत,प्रकाश पाळवदे, ज्ञानेश्वर तोडकर,स्वप्निल शेळके आदीने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे ज्ञानेश्वर तोडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन मोहिनी माने यांनी केले यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!