August 9, 2025

महसूल सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल मधुर बोंदर यांचा सत्कार

  • कळंब- तालुक्यातील देवधानोरा गावचे सुपुत्र मधुर बालाजी बोंदर यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत नुकत्याच लागलेल्या निकालामध्ये महसूल सहाय्यक पदी निवड झाली आहे.या निमित्ताने हार्दिक अभिनंदन व सत्कार करण्यात आला.कळंब पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मगर, बालरोग तज्ञ डॉ.रमेश जाधवर,नेत्ररोग तज्ञ डॉ.अभिजीत जाधवर, मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड,मुख्याध्यापक निशिकांत अडसूळ,महादेव खराटे,प्रा. सचिन बोंदर,डाॅ.राकेश घोडके,जयपाल शिंदे,अमोल पवार,पिनू जाधवर,रमेश शिंदे यांच्या शुभहस्ते मानाचा फेटा बांधुन शाल,श्रीफळ,पुष्पहार, बुके देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना मधुर बोंदर यांनी सदरील यशाचे श्रेय कुटुंबाला दिले.सध्याच्या स्पर्धेच्या युगात कष्टाशिवाय फळ नाही असे मत मांडले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड ,सूत्रसंचालन महादेव खराटे व आभार प्रदर्शन निशिकांत अडसूळ यांनी केले.
error: Content is protected !!