कळंब (अविनाश घोडके) – सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांनी एकत्र येऊन समन्वय साधला पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र लोकविकास मंच राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ तोडकर यांनी केले. ते व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने जेष्ठ पत्रकार आणि कर्तुत्ववान व्यक्ती सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी कार्यकर्ते आणि पत्रकारांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. “समाजाच्या समस्यांकडे लक्ष वेधून त्यावर उपाययोजना घडवून आणणे ही पत्रकारांची जबाबदारी आहे,तर सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या समस्यांवर कार्य करून परिवर्तन घडवले पाहिजे,असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले,आज ग्रामीण भागात पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र,जर त्यांनी एकत्र येऊन काम केले, तर समाजहिताची उद्दिष्टे अधिक प्रभावीपणे साध्य करता येतील. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दि.१२ फेब्रुवारी २०२५ वार बुधवार रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मुंढे कॉम्प्लेक्स येथील सभागृहात व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने दर्पण दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते आचार्य बाळ शस्त्र जांभेकर यांच्या प्रतिमेचे दीप पूजन करून पूजन करण्यात आले. यावेळी सत्कारमूर्ती म्हणून जेष्ठ पत्रकार गणेश शिंदे,माधवसिंग राजपूत,सुभाष घोडके,दिलीप झोरी,तुळशीराम चंदनशिवे तर शैक्षणिक क्षेत्रातील शरदचंद्र महाविद्यालय शिराढोण प्राचार्य डॉ.साजेद चाऊस,आदर्श मुख्याध्यापक म्हणून राजेंद्र बिक्कड,दंतरोग तज्ञ म्हणून डॉ.करिश्मा शेख यांचा शाल,पुणेरी टोपी,ट्राॅफि आणी गिफ्ट देऊन सत्कार करुन सन्मानित करण्यात आले. यावेळी व्हाइस ऑफ मिडिया धाराशिव जिल्हा संघटकपदी दै.धाराशिव नामाचे कळंब तालुका प्रतीनीधी रामराजे जगताप,धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी दिपक बारकुल यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करुन सन्मानित करण्यात आले तर मराठी पत्रकार संघाचे येरमाळा अध्यक्ष लहु बारकुल यांच्यासह त्यांच्या टिम सत्कार करुन सन्मानित करण्यात आले व येरमाळा येथील सेवाभावी समाजीक संस्थेने व्यायाम शाळा आणि येरमाळा येथील पत्रकार भवनासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून घेतल्याबद्दल दिपक बारकुल व त्यांच्या टिम सत्कार करुन सन्मानित करण्यात आले आहे.
तर कार्यक्रमाचे अध्यक्ष रवी नरहरे यांनी जसे ‘डिजिटल इंडिया’च्या माध्यमातून देशभरात डिजिटल क्रांती घडवली जात आहे,तसेच पत्रकारांनीही डिजिटल पत्रकारिता स्वीकारून माहितीचा प्रसार अधिक प्रभावीपणे करावा,डिजिटल युगात पत्रकारितेचे स्वरूप बदलत असल्याचे नमूद करून त्यांनी सांगितले की,आजच्या काळात केवळ पारंपरिक माध्यमांवर अवलंबून राहणे पुरेसे नाही.डिजिटल माध्यमांचा योग्य वापर केल्यास पत्रकारितेच्या कार्यक्षमतेत मोठी वाढ होऊ शकते. ते पुढे म्हणाले,सोशल मीडिया, वेब पोर्टल्स आणि मोबाइल अप्सच्या मदतीने बातम्या वेगाने आणि व्यापक प्रमाणावर पोहोचवता येतात.त्यामुळे प्रत्येक पत्रकाराने डिजिटल कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. तर अन्न,निवारा,आरोग्य आणि शिक्षण या पत्रकारांच्या मूलभूत गरजा आहेत,आणि या गरजा पूर्ण करण्यासाठी ‘व्हाईस ऑफ मीडिया’ सतत प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन अ.नगर जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने यांनी केले. ते व्हाईस ऑफ मीडिया आयोजित कार्यक्रमात बोलत होते.त्यांनी पत्रकारांच्या सध्याच्या परिस्थितीवर प्रकाश टाकताना सांगितले की,पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत, पण अनेकदा त्यांची स्वतःची मूलभूत साधनेही सुरक्षित नसतात.यासाठी ‘व्हाईस ऑफ मीडिया’ त्यांना आवश्यक मदत आणि समर्थन देण्याचा प्रयत्न करत आहे. या कार्यक्रमास अनेक मान्यवर पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते आणि क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.उपस्थितांनी पत्रकारांसाठी अधिक मूलभूत सुविधा आणि समर्थन उपलब्ध होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला त्यामुळे व्हाइस ऑफ मिडिया कळंब शाखेच्या वतीने व्हाइस ऑफ मिडिया महाराष्ट्र राज्य कार्यवाह अमर चोंदे यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करुन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट इंग्लिश स्कूलचे संचालक रवि नरहिरे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पर्याय संस्थेचे सचिव विश्वनाथ (आण्णा) तोडकर आणि उद्घघाटक म्हणून व्हाइस ऑफ मिडियाचे आहिल्या नगर जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून व्हाईस ऑफ मिडिया महाराष्ट्र राज्य कार्यवाह अमर चोंदे,व्हाइस ऑफ मिडिया अहिल्या नगर(द) जिल्हाध्यक्ष गणेश खविटकर,ज्ञानेश्वर पतंगे,बालाजी आडसुळ,परमेश्वर पालकर,शितल कुमार धोंगडे, महादेव महाराज आडसुळ उपस्थित होते.यावेळी प्रमुख मार्गदर्शक विश्वनाथ (आण्णा) तोडकर यांनी उपस्थीतांना शानदार असे मोलाचे मार्गदर्शन केले तसेच रवि नरहिरे,गोरक्षनाथ मदने,गणेश कविटकर,महादेव महाराज आडसुळ यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी व्हाईस ऑफ मिडिया धाराशिव जिल्हा संघटक रामराजे जगताप,जिल्हा उपाध्यक्ष दिपक बारकुल, तालुका उपाध्यक्ष शिवप्रसाद बियाणी,कार्याध्यक्ष रामरतन कांबळे,कोषाध्यक्ष सतीश तवले,सरचिटणीस अविनाश सावंत,तालुका डिजिटल विंगचे तालुका अध्यक्ष अमोल रणदिवे,कार्याध्यक्ष सलमान मुल्ला,साप्ताहिक विंगचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ बारगुले,अतुल मडके,दादा खतीब,हाणूमंत पाटुळे,राहुल गाडे,अनिल गाडे,व तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व व्हाईस ऑफ मिडिया तालुका शाखेच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांनी परिश्रम घेतले. प्रस्ताविक रामरतन कांबळे यांनी केले तर सुत्रसंचलन ह.भ.प बापू जोशी तर आभार दादा खतीब यांनी मानले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात