धाराशिव (अमोल रणदिवे यांजकडून) – अनुकंपा तत्वावर नोकरी करीता घेण्यास टाळाटाळ होत असल्याच्या कारणाने शिक्षण सेवा मंडळ पांगरी संचलित न्यू इंग्लिश स्कुल आंबेजवळगे,तालुका, जिल्हा धाराशिव यांच्या विरोधात धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणकर्ते मित्रजीत रामलिंग गायकवाड व सुजाता रामलिंग गायकवाड यांचे बेमुदत आमरण उपोषण सुरु आहे. सेवाकाळात पतीचे निधन झाल्यानंतर वारसांना अनुकंपा तत्वावरील नोकरी न मिळाल्यामुळे मृतक शिक्षकांच्या पत्नीने आपल्या मुलासह 30/10/2023 पासून धाराशिव जिल्ह्यधिकारी कार्यालय येथे उपोषणास सुरुवात केली आहे. माघील कित्येक वर्षांपासून नोकरी देण्यास टाळाटाळ होत असल्याचा उपोषणकर्त्यांचा आरोप आहे.शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्याचे सेवाकाळात निधन झाल्यास त्याचे पश्चात कुटुंबातील एका व्यक्तीला सर्वसम्मत अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचे निर्देश आहेत. त्यानुषंगाने मृतक रामलिंग गायकवाड यांचा मुलगा मित्रजित रामलिंग गायकवाड यांना संस्थेत रिक्त असलेल्या पदावर अनुकंपा तत्वावर नोकरी दयावी म्हणून शिक्षण सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती केली आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी