धाराशिव (जयनारायण दरक) – एक समाजाचा घटक म्हणून शासन स्तरावर मराठा आरक्षणासाठी होत असलेल्या दिरंगाई पाहता शासन मराठा समाजावर अन्याय करत असल्यामुळे व मला ज्या समाजाने निवडून दिले त्या समाजाच्या घटनेला अनुसरून असलेल्या न्यायिक 50% आतील ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून कळंब तालुक्यातील मंगरूळ मध्ये तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मनोज दिनकर काळे व ग्रामपंचायतचे सदस्य नवनाथ पंडित भराडे यांनी सरपंच सौ. केवळबाई नारायण शिंदे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला. तसेच विविध कार्यकारी सोसायटीच्या खालील पाच संचालकांनी आपल्या पदाचा सहाय्यक निबंधक सहकारी कळंब यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला. सौ.कमलबाई रामरतन रितापुरे व सौ. सज्जनाबाई दत्तू कापसे, मधुकर बाबासाहेब रितापुरे, बिभीषण गोविंद निंबाळकर, रामदास विष्णू माने. यावेळी बाळासाहेब काळे,अँड.घनश्याम रितापुरे,अमृत जाधव, गणेश भोसले,महादेव जाधव,दिनकर गायकवाड,तानाजी रितापुरे,राजाभाऊ रितापुरे आदींची उपस्थिती होती.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड