August 8, 2025

अनधिकृत बांधकाम तात्काळ हटवा अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागास टाळे ठोकण्याचा इशारा

  • कळंब-ढोकी राज्य मार्गावर साखळी क्रमांक १/६०० मध्ये रस्त्याच्या डाव्या बाजूला पुलाजवळ अनधिकृत बांधकाम केले असून ते अनधिकृत बांधकाम तात्काळ काढा व ओढ्याचे पात्र रिकामे करा या मागणीसाठी डिकसळ व कळंब येथील विविध सामाजिक कार्यकर्ते तसेच डिकसळ ग्रामपंचायत सदस्य यांनी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय कळंब तसेच तहसीलदार कळंब यांना लेखी निवेदन दिलेले आहे.
  • तसेच सदरील अनाधिकृत बांधकाम येत्या दोन दिवसात तात्काळ काढा अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयास टाळा ठोकण्याचा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेला आहे यावेळी ज्येष्ठ नेते रामभाऊ आंबिरकर,लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश महासचिव बालाजी गायकवाड,ग्रामपंचायत सदस्य इम्रान भाई मुल्ला,ग्रा.प.सदस्य जनक जाधव,संजय आंबिरकर,ग्रा.प.सदस्य अनंत बोराडे,युवराज धाकतोडे,मोबीन मनियार,ग्रा.प सदस्य रफिक सय्यद,युवराज पिंगळे,गणेश त्रिवेदी,जिव्हेश्वर कुचेकर,विश्वजीत भापकर अफसर पठाण,ग्रा.प.सदस्य अंकुश वाघमारे निवेदनावर आदींच्या सह्या आहेत
error: Content is protected !!