June 20, 2025

  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या प्रतिष्ठित संस्थेत अनिल पवार यांनी १ जुलै १९९८ पासून २६ वर्षे ७ महिने लिपिक म्हणून कार्यरत राहून आपल्या प्रामाणिक सेवेतून संस्थेच्या प्रगतीस मोलाचे योगदान दिले आहे.
    आपुलकी,प्रेमळ संवाद आणि प्रामाणिकपणा या गुणांच्या जोरावर त्यांनी संस्थेच्या प्रशासकीय कार्यात महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली.त्यांच्या कार्यक्षमतेमुळे संस्था आणि कर्मचारी यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे.
    अनिल पवार यांनी आपल्या कार्यकुशलतेने आणि समर्पणाने या शैक्षणिक चळवळीला बळकटी दिली.
    लिपिक म्हणून कार्यरत राहून आपल्या प्रामाणिक सेवेतून संस्थेच्या प्रगतीस मोलाचे योगदान दिले असून संस्थेतील प्राथमिक शाळा पासून वरिष्ठ महाविद्यालयातील हजारो कर्मचाऱ्यांशी व विद्यार्थ्यांशी संपर्क आला आहे.
    “ज्ञान दिप लावू जगी” हे संत नामदेवांचे ब्रीदवाक्य घेवून शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी स्थापन केलेल्या या संस्थेने मराठवाड्यातील २२ शाखांद्वारे बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या.
    अनिल पवार यांनी आपल्या कार्यकुशलतेने आणि समर्पणाने या शैक्षणिक चळवळीला बळकटी दिली.दि.१ फेब्रुवारी २०२५ रोजी शहरातील शि.म.ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात संस्थेच्या वतीने कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या हस्ते सत्कार करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
    याप्रसंगी संस्थेचे संचालक व मराठवाड्यातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या सर्व शाळा व महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांची उपस्थिती होती.
  •  
    दि.२ फेब्रुवारी २०२५ रोजी अनिल पवार यांना प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा शि.म.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रकाशित होत असलेले सा.साक्षी पावनज्योतचे संपादक सुभाष घोडके लिखित विरंगुळा हे पथनाट्य व अग्रलेखांचा संग्रह असलेले पुस्तक उपसंपादक डॉ.कमलाकर जाधव यांच्या हस्ते देवून सेवानिवृत्तीच्या मंगलमय सदिच्छा देण्यात आल्या.याप्रसंगी कार्यकारी संपादक प्रा.अविनाश घोडके,रोहन बचुटे,अजय जानराव आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!