कळंब – अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने कळंब येथे सुवासिनी,विधवा,एकल महिला, परितक्त्या महिला यांचा एकत्रित तिळगुळ वाटप व महिला सन्मानl सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी हळदी व तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम घराघरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.मात्र या अशा कार्यक्रमात केवळ सुवाहिनी महिलांना निमंत्रित करण्यात येते. एकल महिला,विधवा परितक्त्या या महिलांना जाणीवपूर्वक निमंत्रित केले जात नाहीत. याबाबत अनेक धार्मिक रूढी आणि अंधश्रद्धा या पाठीमागे जोडल्या गेलेल्या आहेत. सूसंगत सर्वच महिलांना सन्मानाने जगता आले पाहिजे यासाठी कळंब च्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन शाखेच्या वतीने महिलांना शहरातील विद्याभवन हायस्कूल येथे निमंत्रित करण्यात आले. तिळगुळ देऊन त्यांचा सन्मान सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांना समाजातील अनिष्ठ प्रथा,परंपरा व महिलांचे होत असलेले शोषण, महिलांचे हक्क अधिकार याबाबत बीड येथील माजी प्राचार्या सौ.सविता शेटे यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाच्या मुख्य मार्गदर्शक म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे,बीड येथील माजी प्राचार्या सविता शेटे आदी उपस्थित होते.माधव बावगे यांनी उपस्थित महिलांना भोंदूगिरी करून बुवा,बाबा,बापू यांच्याकडून जादूटोणा,भानामती करून ते महिलांची फसवणूक कशी करतात याचे प्रयोग सादर केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद शिंदे,तालुका कार्याध्यक्षा प्राजक्ता पाटील, अध्यक्ष वर्षा सरवदे,प्रा.मीनाक्षी भवर,प्रा.प्रतिभा भवर,प्रधान सचिव विश्वनाथ सावंत, किसनराव लोंढे,सुरेश धावारे, सिद्धार्थ कांबळे,खराटे,वैज्ञानिक जाणीव जागृती व बुवाबाजी विरोधी संघर्ष समितीचे प्राचार्य जगदीश गवळी,संतोष लिमकर ,आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी शहरातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.यावेळी महिलांना भारतीय संविधानाच्या उद्धेशिकेचे वाटप करण्यात आले.प्रस्तावना प्राजक्ता पाटील व सूत्रसंचालन प्रा.वर्षा सरवदे यांनी केले.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन