कळंब – शहरातील कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूल मध्ये दोन दिवसीय जिल्हास्तरीय विज्ञान,गणित व पर्यावरण प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.गुरुवारी सायंकाळी या प्रदर्शनातील सहभागी प्रयोगांचे बक्षीस वितरण मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाची सुरुवात डॉ.सी. व्ही.रमण यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रजवलन करून करण्यात आली.यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूलचे संस्थापक रवि नरहिरे होते तर उद्घाटक म्हणून महादेव महाराज आडसुळ,कॅनव्हास स्कूलच्या संचालिका श्रीमती आशा नरहीरे,गटशिक्षणाधिकारी धर्मराज काळमाते,विज्ञान अध्यापक मंडळाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र स्वामी,विज्ञान पर्यवेक्षक तारेख काझी,शिक्षण विस्तार अधिकारी,भारत देवगुडे,संतोष माळी,सुशील फुलारी,मैनाबाई मुळे,प्राचार्य संतोष आळंदकर आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अर्चना बाविकर यांनी केले तर आभार रविंद्र स्वामी यांनी मानले.
यांची झाली राज्यस्तरावर निवड – दिव्यांग मधून प्राथमिक गटातून माणिक बाबा विद्यालय शेळगाव ता परंडा येथील प्लॅस्टिक पाईप सुक्ष्मदर्शक तर माध्यमिक गटातून जयस्वामी नारायण विद्यालय समुद्राळ ता.उमरगा येथील गारबेज टॉनिक या प्रयोगाची निवड झाली आहे.तर शिक्षक शैक्षणिक साहीत्यामधून प्राथमिक गटातून जयहिंद विद्यालय तडवळा ता.धाराशिव येथील संदीप पालके यांच्या बेस्ट फ्रॉम वेस्ट तर माध्यमिक मधून जि.प.शाळा सिरसाव ता.परंडा येथील दिपाली सबसगी यांच्या मी सकेलेटन बोलतेय या साहित्याची निवड झाली.
तर प्रदर्शनीय प्रयोग माध्यमिक गटातून सरस्वती विद्यालय तामलवाडी ता.तुळजापूर येथील चार्जिंग कुलर,लिटल फ्लॉवर मराठी स्कूल तुळजापूर येथील अंतर सुचक दर्शक यंत्र,जय हनुमान माध्यमिक विद्यालय तोरंबा येथील कमी जागेत पार्किंग व्यवस्था या प्रयोगाची राज्यस्तरीय निवड झाली. तर प्राथमिक गटातून डॉ.के.डी. शेंडगे इंग्लिश स्कूल उमरगा येथील इलेक्ट्रिसिटी जनरेशन बाय पॉवर,कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूल कळंब येथील नॅचरल फार्मिंग,जि.प.शाळा खडकी ता. तुळजापूर येथील स्मार्ट ब्रीज या प्रयोगाची राज्यस्तरावर निवड झाली आहे.
यांचाही झाला सन्मान — हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी शिक्षण विभाग,विज्ञान अध्यापक मंडळ व कॅनव्हास स्कूल चे प्रशासन गेल्या पंधरा दिवसांपासून प्रयत्न करत होते. यामध्ये विविध कमिटया स्थापन करण्यात आल्या होत्या.या कमिटयांचा,तसेच प्रशासनातील व कॅनव्हासचे कर्मचारी व परीक्षक यांचा सन्मान करण्यात आला.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले