कळंब – ऐश्वर्या संपन्न राष्ट्रसंत, वैराग्यमूर्ती,शिक्षणाचा प्रसार व प्रचार करणारे,अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करणारे ,महान संत भगवान बाबा यांची पुण्यतिथी कळंब शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सर्वप्रथम ह.भ.प महादेव महाराज अडसूळ ,ह.भ.प बोधले महाराज ,नायब तहसीलदार सांगळे ,उद्योजक विठ्ठल माने, मुख्याध्यापक गौतम जाधवर, सेवानिवृत्त प्रशासनाधिकारी विष्णु बोंदर,प्रा.घोळवे , मुख्याध्यापक काकासाहेब मुंडे ,महेश इटकर,अरुण मुंडे, सचिन बोंदर, दिलीप डोईफोडे, उमेश बोंदर,सुनील बिक्कड व उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते संतश्रेष्ठ भगवान बाबांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रसिद्ध व्याख्याते, उद्योजक महादेव खराटे यांनी संतश्रेष्ठ भगवान बाबांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला व त्यांची शिकवण समजावून सांगितली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पिनू जाधवर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदित्य बोंदर, आकाश बोंदर प्रसाद सोनवणे, पाळवदे यांनी परिश्रम घेतले.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी