August 9, 2025

वाचन संकल्प महाराष्ट्राचा ग्रंथ प्रदर्शन व वाचनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

  • कळंब – श्री संत ज्ञानेश्वर सार्वजनिक वाचनालय शेलगांव (ज)तालुका कळंब जिल्हा  धाराशिव येथे दि. 31 व 1 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी नववर्षाच्या मुहूर्तावर वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाअंतर्गत गावातील नागरिक, वाचक, शालेय विध्यार्थी ,शिक्षक यांच्या उपस्थितीत वाचनालयाच्या वतीने ग्रंथप्रदर्शन आयोजित केले होते. या वेळी वाचक
    बाळासाहेब तवले यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. या प्रदर्शनात ऐतिहासिक,थोर पुरुष यांची चरित्र,विज्ञानविषयक, बालसाहित्य,आध्यत्मिक, आरोग्यविषयक,शेतीविषयक, महिलांसाठीचे साहित्य कथा, कादंबऱ्या यासह विविध विषयांवरील मासिके,साप्ताहिके, मासिके यांचीही मांडणी करण्यात आली. यावेळी शालेय विध्यार्थ्यांना पुस्तकांशी मैत्री करा व वाचाल तर वाचाल असा  संदेश नववर्षानिमित  देण्यात आला.मुलांना वाचनालयात  ग्रंथ प्रदर्शन नवीन वर्षाच्या निमित्ताने एक नवी सुरवात केली या वेळी शालेय मुलांना वाचनालय मार्फत विनामूल्य ग्रंथ वाचक अनखीन नवीन सभासद करून घेण्यात येईल व दि 11,रोजी जिल्हा परिषद जिल्हा प्राथमिक शाळा शेलगाव (जं )येथे आनंद मेळाव्या दिवशीच वाचन  घेण्यात आले यावेळी शालेय कमिटीचे अध्यक्ष व गावातील जेष्ठ नागरिक व शाळेतील शिक्षक जिल्हा प्राथमिक शाळेच्या  कार्यक्रमाच्या वेळी सांगण्यात आले.या वेळी वाचनालयाचे सचिव सतीश आदिनाथ तवले पाटील,दीपक उत्तम जाधव,  ग्रामसेविका जाधव मँडम ,व  ह. भ.प.मीराताई सतीश तवले पाटील सल्लाउदिल पठाण, इनुस पठाण, अमोल तवले, रत्नदीप शिंदे, आणि शाळेचे मुख्याध्यापक मुंडे, जगताप स्वाती, कदम सुदर्शन आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!