लातुर – ३ रे फातिमाबी शेख ग्रामीण मुस्लीम मराठी साहित्य संम्मेलनात प्रबोधनकार कु.डाॅ.वैभवी कांबळे घारगावकरला युगस्त्री फातिमाबी शेख पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. यावेळी खा.डाॅ.काळगे,ऊस्मान शेख,अँड.हाशम पटेल,माजी प्राचार्य डाॅ.नागोराव कुंभार,ज्येष्ठ कवि प्रा.फ.म.शहाजिंदे,आशा भिसे,आणि प्रतिष्ठीत मान्यवरांच्या हस्ते शाल,फुलहार,सन्मान ,पुष्पगुच्छ देवुन सन्मानीत केले.कारण वैभवीने डाॅक्टरकीचे शिक्षण घेत भारताच्या आदर्श महामाता राष्ट्रमाता जिजाऊ,राजमाता अहिल्यादेवी,ज्ञानज्योती सावित्री,त्यागमुर्ती रमाई,पहिली डाॅक्टर आनंदी जोशी,यांच्या जिवनावरती एकपात्री येकांकिकेचे विक्रमी तब्बल 282 नाट्यप्रयोग अगदी निशुल्क प्रवासभाडे घेवुन आणि समाज संयोजक देईल ते बक्षीस घेवुन या महामातेचे विचार पेरणीचे कार्य करत ती आपले डाॅक्टरकीचे शिक्षण पुर्ण करत आहे.आणि तिला समाज भरभरुन नेहमी साडीचोळी,फुलहार,शाॅल,स्मृतिचिन्ह,सन्मानपत्र,आर्थीक बक्षीस देवुन वन्समोर असे नेहमी कार्यक्रम सादर करते.आणि तिचा दावा आहे कि,आपल्या देशाचे स्त्रीधन समृद्ध,सक्षम,सुरक्षीत,निर्भय आणि सन्मानीत केवळ या आदर्श महामाताच्या विचारानेच होणार आहे.आणि व्यसनमुक्त समृद्ध मानवी मन यातुनच घडणार आहे.म्हणुन ती सुट्ट्यानमध्ये नेहमी अप्रतीम नैसर्गीक अभिनयातुन साक्षात महामातांचेच दर्शन श्रोत्यांना प्रेक्षकांना देवुन आचंबीत करत अनेक लोंकांना व्यसनातुन मुक्त केले आहे.म्हणुन तिचा येथे साहित्यसंमेलनाच्या संयोजकांनी सन्मानीत केले नि पुन्हा ऊर्जीत केले आहे. या यश बद्दल डॉ.वैभवी कांबळे हिचे बळीराम सुर्यवंशी,विष्णुपंत क्षिरसागर,प्राचार्य डाॅ.चरणदास कांबळे,प्रा.निता करवंजे,प्रा.डाॅ.दिवाकर करवंजे,प्राचार्य डाॅ.संजय गवई,प्रा.डाॅ.सुधीर भीमकर,देविदासबाबा आचार्य,संजीवणी गडेराव,ऊत्तमराव घोडके,भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष मच्छींद्र बलांडेसुधाकर हातागळे,गुरुजी,प्रा.बापुसाहेब गायकवाड,कांताबाई कांबळे,सुनिता शिराढोणकर,शांतिप्रिया सुर्यवंशी,प्रेमनाथ जोगदंड,विलास सोनवणे,मेजर वसंत कांबळे यांनी अभिनंदन केले.
More Stories
जिल्हा परिषद महिला परिचरांच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन यशस्वी!
एकशे सात सुरक्षा रक्षक झाले बेरोजगार;लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा बेभरवशाचा कारभार!
जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होऊन कुटुंबाचा आधार बना – आमदार विक्रम काळे