August 9, 2025

राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी

  • कै.भाई नारायणराव लोमटे माध्यमिक विद्यालय भाट शिरपुरा येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.यावेळी सर्वप्रथम जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुरेश टेकाळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव बाळकृष्ण धस हे होते.यावेळी शाळेतील सहशिक्षक एस.जी.सूर्यवंशी,एच. ए.पानढवळे,एस.एस.डिकले,बी. व्ही.ओव्हाळ उपस्थित होते. यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते व इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी जिजाऊ साहेब यांच्या वेशभूषात आल्या होत्या.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी समृद्धी पाटील,प्रेम राज वाघमारे,प्रिया गायकवाड, शितल गायकवाड,प्रिया जगताप, आयेशा शेख,तृप्ती टेकाळे, सायली टेकाळे,क्रांती भडके या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रिया जगताप व शितल गायकवाड यांनी मानले.
    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोद चाळक व विनायक शिंदे यांनी परिश्रम घेतले.
  • तालुक्यातील मोहा येथील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय जगताप यांच्यासह प्रा.विठ्ठल जाधव, प्रा.शेखर गिरी, प्रा.राहुल भिसे,प्रा.रोहित मोहेकर,प्रा.दिग्विजय पाटील, दिगंबर शिंदे,धनंजय परजणे, ज्ञानोबा टोपे,प्रथमेश साडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन प्रा.राहुल भिसे यांच्या हस्ते करण्यात आले.
  • कळंब शहरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य काकासाहेब मुंडे व उपप्राचार्य डॉ.मीनाक्षी शिंदे भवर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी विद्यालयातील सिद्धी नागनाथ बोरुळे या विद्यार्थिनीने जिजाऊ वंदना घेतली.जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा या स्पर्धेतील स्पर्धकांना राष्ट्रमाता जिजाऊ पतसंस्था यांच्यामार्फत बक्षिसे वितरण करण्यात येणार आहे.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख परमेश्वर मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर तोडकर यांनी मानले.यावेळी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • श्री शरदचंद्रजी पवार विद्यालय खोंदला ता.कळंब येथे राष्ट्रमाता जिजाऊ,थोर महापुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती धाबेकर यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व थोर महापुरुष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.शाळेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.यावेळी शाळेतील विद्यार्थी यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती धाबेकर संगीता,सहशिक्षक भोंडवे महादेव,मुळे बालासाहेब, चव्हाण गोविंद हे उपस्थित होते.
  • कळंब शहरातील सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय सेवाभावी संस्था शिराढोण संचलित समता इंग्लिश स्कुल येथे दि.1२ जाने २०२५ रोजी राष्ट्रमाता जिजाऊ व विवेकानंद स्वामी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
    यावेळी मुख्यधापक वनिता टोम्पे,सना पठाण,किरन पवार,मोहिनी देवकते,नमिता साखरे,प्रमोद चव्हाण व अंजणा वाळके हे उपस्थित होते.
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सलंग्नित छत्रपती शिवाजी महाविद्यालय,कळंब व रासेयो/आयक्युएसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती तसेच युवा दिनानिमित्त दि.१२ जानेवारी २०२५ रोजी महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ,स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन संस्थेचे सहसचिव प्रा.संजयजी घुले व आयक्युएसी विभाग प्रमुख डॉ.अनिल जगताप या मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी डॉ.रघुनाथ घाडगे, विठ्ठल फावडे,जयसिंग चौधरी, सुंदर कदम व महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थीनींनी व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
error: Content is protected !!