August 9, 2025

विविध विकास कामाचे शेतकऱ्यांच्या हातून होणार उदघाटन

  • बाजार समितीचा अनोखा उपक्रम
    कळंब – कृषी उत्पन्न बाजार समिती कळंबच्या पायाभूत सुविधा असणाऱ्या विविध रोडच्या कामाचे उद्घाटन लवकरच संपन्न होणार आहे, कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना जरी ७० वर्षांपूर्वी झालेली आहे.सध्याच्या संचालक मंडळाने बाजार समितीच्या पदभार घेतल्यापासून सभापती शिवाजी कापसे व उपसभापतीं श्रीधर भवर व संचालक मंडळ यांनी शेतकऱ्यांसाठी मनापासून बाजार समितीने कामकाज करणे सुरु केले आहे.बाजार समितीत बदल करणे आवश्यक असल्याने कामकाज पद्धत बदलून विकासाचा ध्यास धरून बाजार समितीच्या आवारात 3.52 कोटी रुपयांच्या कामाचे नियोजन करून बाजार आवार सुशोभित करुण पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व मंजुऱ्या घेउन बाजार समितीतील विविध रस्ते व पावसाळी गटार बांधकाम करणे आधी कामे हाती घेतली असून या विकास कामांचे उद्घाटन समिती शेतकऱ्यांची संस्था असल्यामुळं याचे उद्घाटन शेतकरी बांधवांच्या हातून करावे असा विचार सर्वांनी केला.बाजार समिती कार्यक्षेत्रातील व तालुक्यात नामांकित असणारे कृषीनिष्ठ पुरस्कार विजेत्या शेतकऱ्याच्या हातून व्हावे असा सर्वांनी ठराव पारित केल्याने ने बाजार समितीच्या विकास कामाचे उद्घाटन शेतकऱ्यांच्या हातून होणार आहे.तसेच बाजार समितीत ज्यादा सेस भरणा करणाऱ्या व्यापारी वर्गाचां ही सन्मान केला जानार आहे.मागील कित्येक वर्षापासून शेतकऱ्यांसाठी ही संस्था उभारली आहे अनेक व्यापारी वर्ग यानी तयार केला आहे. बाजार समिती प्रगती करत असली तरी अनेक पायाभूत सुविधां ची आवश्यकता होती, सध्या शेतकरी हा मुख्य केंद्र समजून संचालक मंडळाने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक विविध निर्णय घेतलेले आहेत, शिराढोण उपबाजार पेठ सुरू करणे,ईटकुर बाजार समिती स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणे,बाजार समितीत विविध विकास कामे करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे,आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे.आधी उपक्रम हाती घेतलेले आहेत.शिवाजी आप्पा कापसे यांनी शेतकऱ्यांसाठी व व्यापाऱ्यांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिलेला आहे व इथून पुढे फक्त शेतकरी केंद्रबिंदू मानून बाजार समितीचे वाटचाल केली जाणार आहे असेही त्यांनी सुचवले. बाजार समितीच्या या विकास कामाचा शुभारंभ सोमवार दिनांक 13/01/2025 रोजी दुपारी 12.30 मिनिटांनी होणार असून लवकरच रस्ते सर्व शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना उपलब्ध होतील.येथून पुढे बाजार समिती तीन कोटी पन्नास लक्ष रु.पेक्षा जास्तीचे कामे केली जाणार आहेत.यामुळे व्यापाऱ्यानेही सोयी सुविधा मिळत असल्याने समाधान व्यक्त केलेले आहे असल्याने बाजार समिती सध्या प्रगती कडे वाटचाल करत असल्याने सर्वांनी बाजार समितीकडे चांगल्या दृष्टिकोनातून पाहण्यास सुरुवात केलेली आहे.सदर कार्यक्रमास सर्व शेतकरीबांधव व्यापारी, प्रतिष्ठित व्यक्ती माजी बा. स.पदाधिकारी,पत्रकार,हमाल, मापाडी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सभापती उपसभापती व सचिव यांनी केले आहे.
error: Content is protected !!