धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.07 जानेवारी रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 348 कारवाया करुन 2,71,800 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
परंडा पोलीस ठाणे:आरोपी नामे-रमेश शंकर चव्हाण, वय 45 वर्षे, रा. माणकेश्वर ता. भुम जि. धाराशिव हे दि.07.01.2025 रोजी 09.00 वा. सु. माण्केश्वर शिवारात माणकेश्वर ते देवळाली जाणारे रोडलगत ओढयाचे बाजूस अंदाजे 38,000 ₹ किंमतीचे 200 लिटर गुळमिश्रीत रसायनिक लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रत रासायनिक द्रव व 200 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये परंडा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
लोहारा पोलीस ठाणे:आरोपी नामे-उमेश धनसिंग राठोड, रा. आनंदनगर तांडा खेड ता. लोहारा जि. धाराशिव हे दि.07.01.2025 रोजी 19.50 वा. सु. लोकमंगल साखर कारखाना च्या समोर पत्र्याचे शेडसमोर लोहारा येथे अंदाजे 1,920 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 24 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये लोहारा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
बेंबळी पोलीस ठाणे:आरोपी नामे-शिला नाना पवार, रा.मेडसिंगा ता. जि. धाराशिव हे दि.07.01.2025 रोजी 19.55 वा. सु. मेडसिंगा येथे आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 4,300 ₹ किंमतीची 40 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये बेंबळी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
उमरगा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-योगेश गोविंद गाडे, वय 38 वर्षे, रा.माडज ता. उमरगा जि. धाराशिव यांचे माडज शिवारातील शेत गट नं 3/2 मध्ये पत्र्याचे शेडचे कुलूप तोडूनअज्ञात व्यक्तीने अंदाजे 50,500₹ किंमतीचे सोयाबीन चे 16 कट्टे व पिवळ्या रंगाची ताडपत्री असे दि. 03.01.2025 रोजी 18.30 वा. सु. दि. 04.01.2025 रोजीचे सकाळी 07.30 वा. सु. चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- योगेश गाडे यांनी दि.07.01.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 334(1), 305 (ए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-तेजस भारत चौधरी, वय 33 वर्षे, रा. आथर्डी ता. कळंब जि. धाराशिव यांची अंदाजे 20,000₹ किंमतीची हिरो स्पेलंन्डर कंपनीची काळा रंगाची मोटरसायकल क्र एमएच 12 एम.जे. 5018 ही दि. 05.01.2025 रोजी 10.00 वा. सु. ते दि. 06.01.2025 रोजी 03.30 वा. सु. तेजस चौधरी यांचे राहते घरासमोरुन अज्ञात व्यकृतीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- तेजस चौधरी यांनी दि.07.01.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303 (2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आनंदनगर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे- बबलु प्रकाश राठोड, वय 23 वर्षे, रा.काळा लिंबाळा, ता. उमरगा जि. धाराशिव अंदाजे 35,000₹ किंमतीची हिरो स्पेलंन्डर कंपनीची काळ्या रंगाची मोटरसायकल क्र एमएच 13 डीजी 0486 ही दि. 26.12.2024 रोजी 20.30 वा. सु. ते दि. 27.12.2024 रोजी 07.00 वा. सु. समर्थ नगर काझी हॉस्पीटल समोर धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बबलु राठोड यांनी दि.07.01.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303 (2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे- विष्णु शामराव गायकवाड, वय 55 वर्षे, रा.कसगी ता. उमरगा जि. धाराशिव यांचे कसगी शिवारातील शेतातुन अंदाजे 4,950 ₹ किंमतीची स्पिंकलरचे लोखंडी नउ पाईप हे दि. 29.12.2024 रोजी 19.00 वा. सु. ते दि. 30.12.2024 रोजी 09.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-विष्णु गायकवाड यांनी दि.07.01.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303 (2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“मारहाण.”
कळंब पोलीस ठाणे :आरोपी नामे-उमेश बन्सी वायसे, रा. आढाळा ता. कळंब जि. धाराशिव दोन अनोळखी व्यक्ती यांनी दि.13.11.2024 रोजी 14.40 वा. सु.आढाळा बस स्टॅन्ड येथे फिर्यादी नामे-कैलास सिताराम हगारे, वय 31 वर्षे, रा. आढाळा ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने मारहाण करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-कैलास हगारे यांनी दि.07.01.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 117(2), 115(2), 352, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“रस्ता अपघात.”
मुरुम पोलीस ठाणे: मयत नामे-श्रीगणेश शंकर पांचाळ, वय 29 वर्षे, रा. व्यास नगर नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव व सोबत सुयश सुधीलर पुराणे, वय 28 वर्षे, हे दोघे दि.05.01.2025 रोजी 14.30 वा. सु. मोटरसायकल क्र एमएच 13 सी. एफ. 5194 वरुन नळदुर्ग ते आष्टामोड जात होते. दरम्यान दस्तापुर गावचे अलीकडे दुभाजकाजवळ इरटीका कार क्र एम.एच. 14 एल.जे. 3484 चा चालक आरोपी नामे- देविदास विश्वनाथ सुर्यवंशी रा. जकेकुरवाडी ता. उमरगा जि. धाराशिव चालकाने त्याचे ताब्यातील कार ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून श्रीगणेश पांचाळ यांचे मोटरसायकलला पाठीमागून उजव्या साईडने धडक दिली. या अपघातात श्रीगणेश पांचाळ हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर सुयश पुराणे हा गंभीर जखमी झाला.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-राम मल्लीकार्जुन पांचाळा रा. व्यास नगर नळदुर्ग ह.मु. खपले गल्ली तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.07.01.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 106, 281, 125(अ), 125(ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
“महाराष्ट्र पोलीस दलाचे वर्धापन दिनानिमित्त परंडा पोलीस ठाणे येथे वेगवेगळे उपक्रमाचे आयोजन.”
मा. पोलीस महासंचालक कार्यालय महाराष्ट्र राज्य मुंबई मार्फत निर्गमित करण्यात आलेल्या सुचनांप्रमाणे मा. पोलीस अधीक्षक, श्री. संजय जाधव, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. गौहर हसन, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. गौरीप्रसाद हिरेमठ यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 02.01.2025 रोजी ते दि. 08.01.2025 या कालावधीत महाराष्ट्र पोलीस दलाचा वर्धापन दिनानिमित्त पोलीस ठाणे परंडा कडून वेगवेगळे उपक्रमाचे आयोजन करुन साजरा करण्यात आला. दर सप्ताहात पोलीस ठाणे परंडा अधिकारी व कर्मचारी यांचे कडून शाळा तसेच महाविद्यालयास भेटी देवुन, पोलीस विभागाची माहिती देण्यात आली तसेच महिला व मुलीच्या संरक्षण तसेच महिलांवर होणारे अत्याचार याविषयी माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे परंडा शहरात वर्धापन दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्याची रॅली काढून सामाजिक सुरक्षा तसेच वाहतुक सुरक्षा, वाहतुकीचे नियम व सुरक्षित वाहतुक या विषयी जनजागृत्ती करण्यात आली.
दिनांक 07.01.2025 रोजी शालेय विद्यार्थी यांचे पोलीस ठाणेस भेटीचे आयोजन व शस्त्र प्रदर्शन करण्याचे आयोजन केले असता ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिटयुट प्राथमिक उच्चप्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळा, परंडा व शिवाजी महाविद्यालय परंडा येथील 200 ते 225 विद्यार्थी व शिक्षक यांनी पोलीस ठाणेस भेट देवून पोलीस स्टेशनच्या कामकाजाची माहिती घेतली. सदर वेळी प्रभारी अधिकारी श्री विनोद इज्जपवार, पोलीस निरिक्षक पोस्टे परंडा, यांनी पोलीस दलाचा इतिहास व पोलीस ठाणेचे कामकाज माहिती देवून पोलीस हे पोलीस दादा,पोलीस काका, असुन न घाबरता पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले. सहा. पोलीस निरीक्षक श्री शंकर सुर्वे, यांनी सायबर गुन्हे याबाबत सविस्तर माहिती दिली तर पोलीस उपनिरीक्षक श्री बाबासाहेब खरात, यांनी महिला वरील अत्याचार विरुध्द गुन्हेविषयक माहिती देवून तरुण मुला मुलीनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता काळजी घेण्याचे आवाहन केले.
सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी पोलीस ठाणे परंडा येथील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी परिश्रम घेतले. त्याच बरोबर शिवाजी महाविद्यालय चे मुख्याध्यापक श्री लोखंडे सर, ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिटयुट प्राथमिक उच्चप्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळा, परंडा व परंडाचे संस्थापक श्री गोरख मोरजकर व सचिव तथ मुख्याध्यापक श्रीमती आशाताई मोरजकर मॅडम यांनी पोलीस दलाकडून करण्यात येत असलेल्या कार्याबद्दल आत्मियता व्यक्त केली. तसेच खाकी वर्दीतील आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे श्री विनोद इज्जपवार असे संबोधुन महाराष्ट्र पोलीस दलाचे आभार मानले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला