August 10, 2025

चेअरमन हनुमंत मडके यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेस साऊंड सिस्टिम भेट

मोहा – शिक्षण प्रेमी तथा शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत ( तात्या ) मडके यांचा ५ जाने रोजी वाढदिवसाचे औचित्य साधून ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय मोहा प्रशालेस साऊंड सिस्टिम भेट देण्यात आले.
यावेळी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे जेष्ठ संचालक तात्यासाहेब (आबा ) पाटील,ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेटचे कार्यकारी संचालक विशाल ( बाबा ) मडके ,इम्रान शेख,सुरज मडके तसेच प्रशालेचे सहशिक्षक कमलाकर शेवाळे,श्रीमती पांचाळ उषा,श्रीमती सोनवणे नीता,श्रीमती.स्मिता पाटील,जाधव व्ही.पी आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!