August 10, 2025

कळंब मध्ये भीमा कोरेगाव शौर्य दिन उत्साहात साजरा

  • कळंब – शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती यांच्या वतीने दि.१ जानेवारी २०२५ वार बुधवार रोजी कळंब शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भीमा कोरेगाव शौर्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
    या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक योगदानाची आठवण करून दिली आणि भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक शौर्यगाथेवर प्रकाश टाकला तसेच सामाजिक न्याय व समानतेच्या मूल्यांची जपणूक करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
    यावेळी स्मारक समितीचे विश्वस्त सुनील गायकवाड,कैलास जावळे,प्रमोद ताटे,राजाभाऊ गायकवाड, सतपाल बनसोडे, शिवाजी सिरसट,नागेश धिरे, भाऊसाहेब कुचेकर,शुभम गायकवाड,रवी कदम,भोसले आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!