August 10, 2025

मोहेकर महाविद्यालयास केंद्रीय युवा महोत्सवात लावणीत प्रथम पारितोषिक  

  • कळंब – २५ ते २८ डिसेंबर दरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे नुकताच केंद्रीय युवा महोत्सव – २०२४ आयोजित करण्यात आला होता.
    ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ.सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाने प्रतीवर्षाप्रमाणे याही वर्षी सहभाग घेतला.यात विद्यार्थी कलावंतांनी पाणी म्हणजेच जीवन – मूकअभिनय, शेतकरी बापाची व्यथा – काव्यवाचन,वक्तृत्त्व, पर्यावरण-चित्रकला, देशभक्ती  – रांगोळी,अंधश्रद्धा निर्मुलन – वासुदेव आणि लावणी अशा संकल्पनेवर आधारीत एकूण सात कलाप्रकारांचे विविध रंगमंचावर सादरीकरण आणि सक्रीय सहभाग घेतला. त्यात लोककला प्रकारात राज अशोक सरवदे (बी.ए.द्वितीय ) याने सादर केलेल्या पाटलाचा रुबाब – लावणीस प्रथम पारितोषिक कुलगुरू डॉ.विजय फुलारी,प्रो. कुलगुरू डॉ.वाल्मिक सरोदे, कुलसचिव प्रा.प्रशांत अमृतकर, सिने समीर चौगुले,शाम राजपूत,विद्यार्थी कल्याण विभाग संचालक प्रा.कैलास अंभुरे यांच्या हस्ते मिळाले.
    यावेळी विद्यापीठ परिसरात एकूण सृजनरंग,लोकरंग, नाट्यरंग,नादरंग,शब्दरंग आणि ललितरंग असे भव्य पाच स्टेजवर करण्यात आले होते.
      संघप्रमुख तथा सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी,प्रा.डॉ.पल्लवी उंदरे,  संदीप सूर्यवंशी यांच्या समवेत राज सरवदे,बारस्कर आकाश वाघमोडे अनिल,बारस्कर आकाश,शर्मा शिवप्रसाद, पांचाळ सुमित,उदागे संजना, शेख इब्राहिम,शिंदे वैभवी, शिणगारे प्रांजली आणि भराटे पांडुरंग या दहा विद्यार्थी कलावंतांनी सक्रिय सहभाग घेतला या यशाबद्दल ज्ञानप्रसारक मंडळ संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर,प्राचार्य डॉ.सुनिल पवार,उपप्राचार्य डॉ. के.डी.जाधव,डॉ. हेमंत भगवान,प्रा.आप्पासाहेब मिटकरी, प्रा.दादाराव गुंडरे, प्रा.अर्चना मुखेडकर,डॉ.डी.एन. चिंते,प्रा.ईश्वर राठोड,अधीक्षक हनुमंत जाधव,ग्रंथपाल अनिल फाटक,अरविंद शिंदे यांनी अभिनंदन केले. तसेच या युवक महोत्सवात विविध महाविद्यालयातील २९३ संघ सहभागी झाले होते. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!