August 8, 2025

महापुरुषांचे विचार पुढे नेण्यासाठी वैचारिक लढाई करावी लागेल – प्रा.योगेंद्र यादव

  • ( भारत जोडो अभियान तथा स्वराज इंडियाचे प्रमुख प्रो.योगेंद्र यादव हे लातूर येथील विभागीय मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी आले असता,त्यांना बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रकाशित होत असलेला सा.साक्षी पावनज्योतचा महाराष्ट्र लोकविकास मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक सेवक विश्वनाथ अण्णा तोडकर एकसष्टी विशेषांक संपादक तथा स्वराज इंडिया तथा भारत जोडो अभियानचे धाराशिव जिल्हा समन्वयक सुभाष द.घोडके यांच्या हस्ते देण्यात आले.
    याप्रसंगी इतर पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.)
  • लातूर- भारत देशातील राष्ट्रीय संत व महापुरुष यांच्या कार्याचा व पुरोगामी विचाराचा समृद्ध असा वारसा पुढे नेहण्यासाठी, महापुरुषांचे नुसते नाव घेऊन चालणार नसून उर्वरित कार्य पुढे नेहण्यासाठी वैचारिक विचाराची लढाई करावी लागेल असे प्रतिपादन प्रसिद्ध समाजवादी विचारवंत तथा भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक प्रा.योगेंद्र यादव यांनी दिनांक २१ डिसेंबर २०२४ रोजी अंजली हॉटेल लातूर येथील हॉलमध्ये भारत जोडो अभियान मराठवाडा विभागीय मेळाव्यात बोलत असतानी केले.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणपत पाटील हे होते तर मंचावर जय किसान आंदोलनाचे साथी सुभाष लोमटे,राजकुमार होळीकर,प्रा.सुधीर आनवले,दत्ता तुमवाड आदींची उपस्थिती होती. प्रा.योगेंद्र यादव बोलताना पुढे म्हणाले की,बाबरी मस्जिद तोडली तेव्हाच आर.एस.एस. कडून आपणास इशारा मिळाला होता मात्र आपण गाफील राहिलोत,त्याचा परिणाम आज भोगत आहोत.आपण जेष्ठ नागरिक असल्याने फोटो फ्रेम मध्ये बंद होण्याआदी किमान दहा कार्यकर्ते तयार करून त्यांना वैचारिक लढाईची प्रेरणा द्यावी.
    या मेळाव्यात शेतकरी,कष्टकरी,दलित, आदिवासी,भटके,विमुक्त,महिला यांच्यावर दर दिवशी होणारी हल्ले आणि संविधानाचे केले जाणारे अवमूल्यन ही आव्हाने भारत जोडो अभियान कसे पेलनार यावर विचार मंथन झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुधीर आनवले यांनी केले तर आभार राजकुमार होळीकर यांनी मानले.
error: Content is protected !!