कळंब (राजेंद्र बारगुले) – स्वच्छतेचा संदेश देणारे गाडगे बाबा महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त दि.२० डिसेंबर २०२४ रोजी धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने व भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षणार्थींनी कँम्पसमध्ये स्वच्छता मोहीम राबवून गाडगे बाबांना अभिवादन केले. यावेळी भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सूरज भांडे,निदेशक अविनाश म्हेत्रे,निदेशक राजकुमार शिंदे,आदित्य गायकवाड,विनोद कसबे,विनोद जाधव आदींची उपस्थिती होती.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी