लातूर – सध्या शेतकरी,कष्टकरी,दलीत – आदिवासी-भटके विमुक्त,महिला यांचेवर दर दिवशी होणारे हल्ले आणि संविधानाचे केले जाणारे अवमूल्यन,त्याच बरोबर जात – धर्मातील बखेडे इ.मुळे सामाजिक विण उसविली जात आहे.या आव्हानांना भारत जोडो अभियान कसे सामोरे जाणार, यावर मेळाव्यात सखोल मंथन केले जाणार असून त्यावर निश्चित उपाय योजना करून, ठोस कार्यक्रम ठरविला जाणार आहे.यासाठी भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय संयोजक प्रो.योगेंद्र यादव,जय किसान आंदोलन-स्वराज अभियान/ भारत जोडो अभियानाचे साथी सुभाष लोमटे हे मार्गदर्शन करणार आहेत. तर साथी दत्ता तुमवाड,साथी शेख शकीला,डॉ.प्रताप परभनकर,साथी बळवंत मोरे ( नांदेड),साथी संग्राम नायक ( हिंगोली),डॉ.सुनील जाधव ( परभणी),साथी विश्वनाथ तोडकर,साथी सुभाष घोडके , डॉ.स्मिता शहापूरकर ( धाराशिव),साथी जीवन राठोड, साथी सुनील क्षीरसागर ( बीड),अँड.डी.के.कुलकर्णी ( जालना),साथी रामचंद्र काळे, साथी.भाऊसाहेब पठाडे,प्रा. मच्छिंद्र गोरडे,प्रा.सुभाष महेर, डॉ.शेख इक्बाल मिन्ने, प्रा.श्रीराम जाधव,अँड.सुभाष सावंगीकर ( छ.संभाजीनगर-औरंगाबाद ) यांची उपस्थिती राहणार आहेत. या मेळाव्यास वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन भारत जोडो अभियान,लातूरचे प्रा.सुधीर अनवले,साथी राजकुमार होळीकर,साथी गणपत पाटील यांनी केले आहे.
More Stories
त्याग,समर्पण आणि प्रेरणेचा जागर;माता रमाई जयंती उत्साहात साजरी
आई-वडिलांमुळेच आपल्या अस्तित्वाची ओळख –डॉ.सुनील गायकवाड
खरोसा लेणी येथे माघ पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा;६५ धम्म अनुयायांचा सहभाग