February 9, 2026

सन २०२५ वर्षातील स्थानिक सुट्ट्या जाहीर

  • धाराशिव (जिमाका) – सन २०२५ या वर्षातील स्थानिक सुट्ट्या जिल्हाधिकारी डॉ.मैनक घोष यांनी जाहीर केल्या आहे.सन २०२५ या वर्षात तीन स्थानिक सुट्ट्या देण्यात आल्या आहे.
    यामध्ये १७ जानेवारी २०२५ (शुक्रवार) – हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाजी रहे दर्ग्याचा ऊर्स,१ सप्टेंबर २०२५ (सोमवार) – ज्येष्ठा गौरी पूजन आणि २० ऑक्टोबर २०२५ (सोमवार) – नरक चतुर्दशी अभ्यंग स्नान या सुट्ट्यांचा समावेश आहे.
    या स्थानिक सुट्ट्या जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालये,जिल्हा परिषदेअंतर्गत येणारी कार्यालये, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कार्यालये,कोषागार कार्यालये व इतर शैक्षणिक संस्था यांनाच लागू राहतील.
    जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये,केंद्र शासनाच्या कार्यालयांना व बँकांना या सुट्ट्या लागू राहणार नाही.
error: Content is protected !!