धाराशिव (जिमाका) – केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाकडून संपूर्ण देशभर ” देश का प्रकृती परीक्षण ” अभियानाचा पहिला टप्पा २६ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीमध्ये राबविण्यात येत आहे.या अनुषंगाने शासकीय आयुर्वेद महाविद्यालय धाराशिवचे प्राध्यापक,निवासी डॉक्टर्स, प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स,पदवी शिक्षण घेणारे विद्यार्थी संपूर्ण धाराशिव शहरात शासकीय कार्यालये,महाविद्यालये,निवासी संकुल इत्यादि भागात जाऊन नागरिकांचे प्रकृती परीक्षण करत आहेत.जिल्हा परिषद कार्यालयामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.मैनक घोष यांचे प्रकृती परीक्षण शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.गंगासागरे व सहायक प्रा.डॉ.मयूर देशमुख यांनी केले. याप्रसंगी डॉ.मैनक घोष यांनी आपले प्रकृती परीक्षण करून घेण्यासाठी देश का प्रकृती परीक्षण अभियानात नागरिकांनी सहभागी व्हावे.असे आवाहन केले. प्रकृती परीक्षणाचा सर्व नागरिकांना फायदा होणार आहे.त्यामुळे आपण आपल्या प्रकृतीनुसार आहार विहाराचे योग्य नियोजन करून आजारास प्रतिबंध करू शकतो तसेच कोणत्या व्याधी होण्याचा शरीराचा कल आहे हे पण यातून लक्षात येते,अशी माहिती अधिष्ठाता डॉ.गंगासागरे यांनी दिली. डॉ.घोष यांच्यानंतर जिल्हा परिषदेमधील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे प्रकृती परीक्षण शासकीय आयुर्वेद महाविद्यालय,धाराशिव यांचेकडून करण्यात आले.जिल्हा परिषदेतील अभियानाचे संपूर्ण नियोजन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास व जिल्हा आयुष अधिकारी डॉ.गजानन परळीकर यांनी केले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला