कळंब – शहरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 6 वी व 9 वी मध्ये शिक्षण घेत असलेले आरती विजय सुद्रिक, राजवीर चेतन भवर,कृष्णा अंकुश जाधव या विद्यार्थ्यांनी ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर असोसिएशन यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या डॉ.होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा मान मिळवल्याबद्दल त्यांचा विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य काकासाहेब विश्वनाथ मुंडे ,उपप्राचार्य डॉ. मीनाक्षी शिंदे भवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर त्यांना मार्गदर्शन करणारे विज्ञान विषय शिक्षक शंकर गोंदकर,ज्ञानेश्वर तोडकर यांचा सन्मान विद्यालयाचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख परमेश्वर मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन तानाजी गोरे यांनी मानले यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
बजरंग ताटे जिल्हास्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्काराने सन्मानित
कळंबचे उपजिल्हाधिकारी संजय पाटील यांच्यासह पवार,माळी पुरस्काराने सन्मानित..!
कळंब येथे ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने पालावर रक्षाबंधन