June 25, 2025

संविधान शिल्पाच्या विटंबनेच्या निषेधार्थ मोहा कडकडीत बंद

  • कळंब – तालुक्यातील मोहा येथे परभणी येथे झालेल्या संविधानाच्या विटंबनेचा निषेध म्हणून दि.१७ डिसेंबर २०२४ रोजी भीम नगर येथील समस्त भीमसैनिकांनी मोहा बंदची हाक दिली होती. त्याला प्रतिसाद देत गावकऱ्यांनी दिवसभर आपले दुकाने बंद ठेवून परभणी येथील घटनेचा निषेध केला.
    यावेळी भीम नगर येथील भिमसैनिक यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनामध्ये परभणी येथील घटनेमध्ये जबाबदार असणाऱ्या दोषीवर तात्काळ कारवाई करावी,या घटनेदरम्यान अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांच्या ताब्यात असताना झालेल्या मृत्यूचे प्रकरण फास्टट्रॅक कोर्ट वर चालवून दोषींना लवकरात लवकर शिक्षा देण्याचे काम करावे व पीडीतास न्याय द्यावा ही मागणी करण्यात आली तसेच परभणी येथील आंदोलनात निष्पाप भीम सैनिकावर दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावे अशा स्वरूपाची मागणी मोहा येथील ऑल इंडिया पॅंथरचे जिल्हाध्यक्ष अशोक कसबे,बाबासाहेब कसबे,राहुल कसबे,विशाल कसबे,शुभम कांबळे,तानाजी कसबे आदी लोकांनी निवेदनामार्फत प्रशासनाकडे केली आहे.
error: Content is protected !!