गोविंदपूर (अविनाश सावंत ) – तालुक्यातील गोविंदपूर येथील जिल्हा परिषद केंद्रिय प्राथामिक शाळेत पहिली ते सातवी विद्यार्थ्यांचा बाल आनंद मेळावा घेण्यात आला.विद्यार्थ्यांना ‘कमवा व शिका’ याची जाणीव होण्यासह विविध व्यवसाय व व्यवहाराची माहिती व्हावी, यासाठी हा बाल आनंद मेळावा घेण्यात आला.आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ पदार्थ व वस्तूचे स्टॉल लावले होते.यात पाणीपुरी,भेळ, पालेभाज्या,गुलाब जामुन,आप्पे, कचोरी,वडापाव,इडली,मसाला पापड,भजे,पॅटिस आदी खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक कनकवाड, कबन मुंडे,शौलेय समिती आध्यक्ष वृंदावनी विष्णू मुंडे, अनंत घोगरे,विष्णू मुंडे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सहशिक्षक देशमाने,श्रीमती पाटील, व श्रीमती मुंडे के.के.,दिवटे डी.बी,ढोणे,माळी,श्रीमती नागटिळक,श्रीमती जमाले व श्रीमती होवाळ आदींनी परिश्रम घेतले.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून मेळाव्याचा आनंद लुटला.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन