August 9, 2025

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन

  • कळंब – विद्वतेचा प्रकांड पांडित्य विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व संचालक तथा मुख्याध्यापक विलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब शहरातील विद्याभवन हायस्कूल येथे परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक विलास पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
    यावेळी संविधान पत्रिकेचे वाचन करण्यात आले. प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक पवार एस.जे यांनी संविधानाबद्दल माहिती सांगितली.
    समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा दिला.त्यांच्या संविधानाने भारताला समता, न्याय,आणि बंधुतेचा मार्ग दाखवला.यावेळी प्रशालेचे उपमुख्याध्यापक कुंभार व्ही.जी, पर्यवेक्षक मयाचारी व्ही.एस, आदींसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
error: Content is protected !!