August 9, 2025

महाराष्ट्र लोकविकास मंचाच्या पुढाकाराने मजुरांची मुक्तता

  • कळंब – कळंब तालुक्यातील दाभा गावच्या ऊसतोड कामगारांना लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील मुकादम तुळशीराम गायकवाड यांनी उत्तर सोलापूर मध्ये सोलापूर तुळजापूर रोडपासून आत असलेल्या उळे गावं ठरवड ऐकूर्गा गावाच्या बाजूला धरनातं तुळशीराम गायकवाड या गुत्तेदाराने ऊसतोड कामगाराना बंदिस्त केल्याचा निरोप महाराष्ट्र लोक विकास मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ (अण्णा) तोडकर यांना लागला.
    यावेळी त्यांच्याकडून तातडीने भूमिपुत्र वाघ यांना या संदर्भात कार्यवाही करण्यासाठी माहिती देण्यात आली.वाघ यांनी या संदर्भातील माहिती मिळाल्यावरून,पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना फोन करून माहिती देऊन विनंती करण्यात आली.सोबत संबंधित पोलीस स्टेशनला अतुल कुलकर्णी यांनी निरोप दिला. संबंधित पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक राहुल देशपांडे, एपीएम माने यांनी तातडीने कार्यवाही केली.बंदिस्त करून ठेवलेल्या ऊसतोड कामगारांना मुक्त केले.सोबत छत्रपती संभाजी नगरच्या कॉन्स्टेबल पार्वती (राणी)भोसले यांचीही हे कार्यवाही करण्यासाठी आणि संपर्क करण्यासाठी मदत झाली.तेव्हा वरील सर्व अधिकारी आणि पोलीस प्रशासनातील सर्व कर्मचाऱ्यांचे महाराष्ट्र लोक विकास मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ (अण्णा) तोडकर,भूमिपुत्र वाघ यांचे कौतुक होत.
error: Content is protected !!