धाराशिव (जिमाका) – जिल्ह्यातील माजी सैनिक, वीरनारी, विरपिता व सर्व व वयोवृद्ध सैनिकांसाठी पेंशन व स्पर्शसंबधी असलेल्या सर्व अडचणीचे निराकरण करण्यासाठी १५ डिसेंबर रोजी बेळगाव येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्हयातील माजी सैनिक / वीरनारी / विरपिता व सर्व वयोवृद्ध सैनीकासाठी १५ डिसेंबर २०२४ रोजी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट सेंटर बेळगाव येथील शिवाजी स्टेडियम येथे सकाळी ८.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेळाव्यात उपस्थित राहावे. या मेळाव्यामध्ये पेंशन व स्पर्शसंबधी असलेल्या शंका व अडचणीचे निराकरणा व्यतिरिक्त वन रैंक वन पेंशन व अन्य शासकीय योजनांबाबत माहिती व मार्गदर्शन प्रधान नियंत्रक रक्षा लेखा कार्यालय ( अधिकारी ) प्रयागराज कार्यालयातील प्रतिनिधी करतील.तरी या मेळाव्याला सर्व सेवानिवृत्त सैनिक अधिकारी,माजी सैनिक / वीरनारी / विरपिता व सर्व वयोवृद्ध सैनिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थीत रहावे.असे आवाहन मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट सेंटर बेळगाव व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी धाराशीव यांनी केले आहे.अधिक माहितीकरिता दूरध्वनी क्रमांक ०८३१-२४०२८२१ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी