August 9, 2025

३५० पेक्षा अधिक युवावर्गाच्या सुप्त कलागुणांना मिळाली चालना

  • धाराशिव (जिमाका) – दोन दिवशीय जिल्हा युवा महोत्सवात युवा वर्गाच्या अंगी असलेल्या कलेच्या सुप्त कलागुणांना चालना मिळाली.जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नेहरु युवा केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने व राष्ट्रीय सेवा योजना,धाराशिव यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी नाटयगृह,धाराशिव येथे ४ व ५ डिसेंबर रोजी आयोजित जिल्हास्तर युवा महोत्सवाचा उत्साहात समारोप झाला.
    जिल्हा युवा महोत्सवात जिल्हयातून ३५० युवक / युवती,विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेतून कला सादर केली.जिल्हा युवा महोत्सवात यश संपादन केलेल्या कलाकारांची विभागस्तरावरील युवा महोत्सवासाठी निवड करण्यात आली.
    जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक संपादन केलेल्या संघ व कलाकारांना जिल्हा कोषागार अधिकारी अर्चना नरवडे,सार्वजनिक बांधकाम विभाग ( विद्यूत ) चंद्रकांत चकोते,जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे,नेहरू युवा केंद्रचे धनंजय काळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे श्री.डी.वाय.साखरे, भोसले हायस्कुलचे प्राचार्य नंदकुमार ननवरे यांच्या हस्ते पारितोषक,स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
    यावेळी परिक्षक म्हणून मिलींद माने,सतीश ओव्हाळ,सुर्यकांत कापसे,श्रीराम नागरगोजे,विनोदकुमार वायचळ,माधुरी कुलकर्णी,दिपक दहिफळे,प्रा.डॉ.उमेश सलगर,सुहास झेंडे, प्रा.डॉ.वैभव आगळे,एस.डी.भोसले,एस.टी.गांगुर्डे,संजय कोथळीकर,डॉ. दत्तात्रय साखरे,डॉ.होळंबे, डॉ.ननवरे,श्री.वाघमारे,समीर माने,श्री.पौळ,श्री.नागापूरे,श्री.चौधरी यांनी काम पाहिले.
  • जिल्हा युवा महोत्सवाचा अंतिम निकाल
    लोकनृत्य स्पर्धा (प्रथम) – भवानी शंकर बहुउद्देशीय संस्था,तुळजापूर (द्वितीय) -श्रीपतराव भोसले हायस्कुल,(तृतीय) – आर.पी.कॉलेज धाराशिव
    लोकगीत स्पर्धा (प्रथम) भवानी शंकर बहुउद्देशीय संस्था,तुळजापूर (द्वितीय) व्यंकटेश महाजन महाविद्यालय,धाराशिव,(तृतीय) जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येडशी
  • कथा लेखन स्पर्धा (प्रथम) मुंढे वैभव विकास (द्वितीय) वाघमारे सुधांशु दिलीप (तृतीय) खोगरे वैष्णवी दत्तात्रय,वक्तृत्व स्पर्धा लेखन (प्रथम) शेख समीर मजनू (द्वितीय) आदिती आनंदराव ओव्हाळ (तृतीय) सायली सुरेश मुंडे,कविता लेखन स्पर्धा(प्रथम) अदमिले वैष्णवी धर्मराज (द्वितीय) मुंडे वैभव विकास (तृतीय) भोरे रोहित प्रभाकर
    फोटोग्राफी स्पर्धा (प्रथम) वैष्णवी आदमिले (द्वितीय) उमर फारूक शेख (तृतीय) वराळे सुनिल बाळासाहेब,चित्रकला स्पर्धा (प्रथम) जगदिश बसवराज सुतार,(द्वितीय) गायकवाड वैष्णवी नितीन,(तृतीय) गोरे काजल माणिक संकल्पना आधारित स्पर्धा ( विज्ञान व तंत्रज्ञान नवसंकल्पना ) (प्रथम) श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापूर,(द्वितीय ) तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव (तृतीय) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,धाराशिव विजेते ठरले.
error: Content is protected !!