August 8, 2025

संविधान दिन अमृत महोत्सवा निमित्त एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

  • धाराशिव – ‘संविधान दिन अमृत महोत्सव’ निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर,धाराशिव येथे दि.३० नोव्हेंबर २०२४ रोजी भौतिकशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यशाळेचे आयोजन संचालक डॉ.पी.पी.दिक्षित यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. सदरील कार्यशाळेच्या उद्घाटन सत्राला प्रा.डॉ.जी.डी.कोकणे, प्राध्यापक,इंग्रजी विभाग हे अध्यक्ष तर डॉ.रत्नाकर मस्के, सहयोगी प्राध्यापक,श्रीमती सुशीलादेवी साळुंखे कॉलेज ऑफ एज्युकेशन,धाराशिव हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय संबोधना मध्ये डॉ. जी. डी. कोकणे यांनी संविधान योग्य अंमलबजावणी माध्यमातून देशाचा आर्थिक, सामाजिक,सांस्कृतिक विकास गुणवत्तापूर्ण होईल असे म्हटले. संविधान विषयी प्रत्येक नागरिकाला आस्था असणे आवश्यक आहे.नागरीकांंनी मुलभूत अधिकारा सोबत कर्तव्याबाबतीत जागरूकता दाखविली पाहिजे.संविधान विषयक जागृती निर्माण करण्याकरिता अश्या कार्यशाळेंचे अधिक आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.रत्नाकर मस्के यांनी स्वातंत्र्य आणि स्वैराचार यावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रमातून विद्यार्जन करावे. ज्ञानाचा उपयोग समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी करावा, असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यशाळेचे प्रमुख वक्ते प्रा. परिवर्तन जगझाप,भौतिकशास्त्र विभाग यांनी पुढील दोन सत्रामध्ये भारतीय संविधाना विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रा. जगझाप यांनी मूलभूत हक्क आणि राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्वे यांवर प्रकाश टाकून मतदानाचे महत्व अधोरेखित केले. प्रा.जगझाप यांनी आपल्या मार्गदर्शनात संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी,मूलभूत रचना सिद्धांत,समान नागरी संहिता,संसदेची रचना या सह विविध विषयावर मार्गदर्शन केले. या एकदिवसिय कार्यशाळेचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.एम.के. पाटील यांनी तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.आर.एम. खोब्रागडे यांनी केले. सदरील कार्यशाळेमध्ये सूत्रसंचालन कु. ऋतुजा लबडे यांनी केले. सदर कार्यशाळेस विद्यार्थी तसेच कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!